स्व.प्रकाश डहाके यांच्या समर्थकाची सहविचार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:27 AM2021-06-23T04:27:06+5:302021-06-23T04:27:06+5:30

प्रकाश डहाके यांच्या निधनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या समर्थकांची सहविचार सभा बाजार समितीच्या सभागृहात २१ जून ...

Meeting of supporters of late Prakash Dahake | स्व.प्रकाश डहाके यांच्या समर्थकाची सहविचार सभा

स्व.प्रकाश डहाके यांच्या समर्थकाची सहविचार सभा

Next

प्रकाश डहाके यांच्या निधनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या समर्थकांची सहविचार सभा बाजार समितीच्या सभागृहात २१ जून रोजी पार पडली.

गत महिन्यात माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा मोठा गट पोरका झाला. एकाएकी उद्भवलेल्या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी मानोरा बाजार समितीच्या आवारात सहविचार सभेचे आयोजन केले होते. या वेळी अनेक मान्यवरांनी प्रकाश डहाके यांच्या निधनामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांशी हितगूज साधणारा लोकनेता आपण गमावला अशी भावना व्यक्त केली. यावेळी डहाके परिवाराच्यावतीने दत्तराज डाहाके व देवव्रत डाहाके यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मागे डहाके परिवार खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. यावेळी सहकार नेते सुरेश गावंडे, कारंजा येथील पदधिकारी माजी जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र ताथोड, सभापती विश्वनाथ रोकडे, नितीन पाटील नेमाने, अशोक पाटील मुंदे, जि.प. सदस्य चंद्रशेखर डोईफोडे, अशोक डोंगरदिवे, आशिष दाहातोंडे, प्रविण वानखडे, देवा राऊत, सुरेश पाटील दहातोंडे , उत्तमराव ताथोड , बाबाराव पाटील ठाकरे , प्रमोद कडू, संजय राठोड, बालचंद जाधव, माजी सभापती अशोकराव देशमुख, सभापती गोविंद चव्हाण, उपसभापती राजेश नेमाने, डॉ. श्याम जाधव, भोजराज चव्हाण, माजी जि प सदस्य भाऊ नाईक, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष इप्तेखार पटेल, प्रकाश राठोड, शिवसेनेचे शहरप्रमुख राजु देशमुख, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष डॉ रामराव राठोड, डॉ. उकंडा राठोड, राम राठोड, सुनीता राठोड, विनोद आप्पा घाटरे, मित्तल धोटे, दिनेश मोरे, दिलीप पडवाल आदी कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

Web Title: Meeting of supporters of late Prakash Dahake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.