‘वॉटर न्यूट्रल’वरून सभा गाजली
By admin | Published: February 5, 2017 01:55 AM2017-02-05T01:55:41+5:302017-02-05T01:55:41+5:30
वाशिम जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा.
वाशिम, दि. ४- कृषी विभागाने ह्यवॉटर न्यूट्रलह्ण ठरविलेल्या गावातही पाणीटंचाई जाणवत असल्याने फेरसर्वेक्षण करण्यात यावे या मुख्य विषयासह अन्य मुद्यांवर जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा गाजली.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात शनिवारी दुपारी १ वाजता सुरू झालेल्या स्थायी समितीच्या पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, समाजकल्याण सभापती पानुताई दिलीप जाधव, महिला व बालकल्याण सभापती यमुना जाधव आदी मंचावर उपस्थित होते. सुरूवातीलाच ह्यवॉटर न्यूट्रलह्णचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे, देवेंद्र ताथोड यांच्यासह सदस्यांनी उपस्थित केला. गावांमधील जलपातळीचा सर्वे केल्यानंतर जिल्हाभरातील अनेक गावे ह्यवॉटर न्यूट्रलह्ण या संकल्पनेत समाविष्ठ करण्यात आली. ह्यवॉटर न्यूट्रलह्ण म्हणजे त्या गावातील जलपातळी समाधानकारक आहे, असे गृहित धरले जाते. या संकल्पनेत समाविष्ठ गावांमध्येही पाणीटंचाई निर्माण झाल्याने ह्यवॉटर न्यूट्रलह्णसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. संबंधित गावांमध्ये पाणीटंचाई असतानाही केवळ ह्यवॉटर न्यूट्रलह्णमुळे त्या गावात जलसंधारणाची कामे घेता येत नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून ह्यवॉटर न्यूट्रलह्णसंदर्भात फेर सर्वेक्षण करण्याची एकमुखी मागणी सदस्यांनी लावून धरली.