इंझोरीत प्रकल्पग्रस्तांसाठी मार्गदर्शन मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:39 AM2021-02-12T04:39:04+5:302021-02-12T04:39:04+5:30
विदभार्तील शेकडो प्रकल्पांतील हजारो प्रकल्पग्रस्तांना आपली पिढीजात जमिनी, घरे कवडीमोल दराने शासनाच्या स्वाधीन करावी लागली आणि हजारो प्रकल्पग्रस्त परिवारांना ...
विदभार्तील शेकडो प्रकल्पांतील हजारो प्रकल्पग्रस्तांना आपली पिढीजात जमिनी, घरे कवडीमोल दराने शासनाच्या स्वाधीन करावी लागली आणि हजारो प्रकल्पग्रस्त परिवारांना बेघर भूमिहीन व्हावे लागले. कधी कायद्याचा धाक दाखवून, तर कधी कायद्याची पायमल्ली करीत प्रकल्पग्रस्तांना देशोधडीला लावले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत असून, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने संपूर्ण विदर्भातील प्रकल्पग्रस्तांना संघटित करून लढा उभारला आहे. त्याअनुषंगाने १४ फेब्रुवारी मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला असून, सदर मेळाव्याला समीतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. साहेबराव विधळे काका, समिती अध्यक्ष मनोज चव्हाण व समितीचे इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी वाशिम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी आपल्या सर्व समस्यांसह आपले आधार कार्ड, २ पासपोर्ट फोटो घेऊन आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिल्हा वाशिम तथा प्रकल्पग्रस्त मानोरा तालुका अध्यक्ष गणेश नायसे, गिरोलीचे प्रकल्पग्रस्त मो. रियाज शेख यांनी केले आहे.