‘ब्रेवेट’ सायकल स्पर्धेत मेहकरच्या ‘डॉक्टर ग्रुप’ ने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:40 PM2018-02-20T14:40:45+5:302018-02-20T14:43:56+5:30
वाशिम : वाशिम ते अकोला व अकोला ते वाशिम या २०० किलोमीटर ब्रेवेट सायकल स्पर्धेत मेहकरच्या डॉक्टर ग्रुपने बाजी मारली. त्यांचा सायकलस्वार गृपच्यावतिने सत्कार करण्यात आला.
वाशिम : वाशिम ते अकोला व अकोला ते वाशिम या २०० किलोमीटर ब्रेवेट सायकल स्पर्धेत मेहकरच्या डॉक्टर ग्रुपने बाजी मारली. त्यांचा सायकलस्वार गृपच्यावतिने सत्कार करण्यात आला.
१८ फेब्रुवारी रोजी वाशिम - अकोला - बाळापूर परत वाशिम -अकोला २०० किलोमीटर सायकल चालवण्याचे आव्हान सायकल पटूना देण्यात आले होते . यामध्ये मेहकरच्या डॉक्टर मंडळींनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये डॉ. अमित जोशी , डॉ. प्रमोद जाधव, डॉ अनिल राठोड ,प्रशांत देवठाणे , गजानन कुलसुंदर, विनायक चांगडे व एलदारीचे शिक्षक प्रमोद भालेराव, वाशिम सायकलस्वारचे चेतन शर्मा ,मदन खंडेलवाल असे एकूण ९ सायकलस्वार यामध्ये सहभागी होते . या ९ सायकलस्वारपटूमधील ८ सायकलस्वारांनी वेळेच्या आत येऊन ही ब्रेवेट स्पर्धा पूर्ण केली. २०० किलोमीटर सायकलिंग १३ तास ३० मिनिट या वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान सायकल पटूंना देण्यात आले होते . यामध्ये डॉक्टर लोकांचा सहभाग वाढल्याने प्रदूषण मुक्तीचा मोठा संदेश समाजामध्ये पोहचायला सुरवात झाली आहे . ब्रेवेट स्पर्धेत सहभागी सायकलस्वाराच्या मागे उभे राहून पर्यवेक्षक म्हणून अलका गिºर्हे ,पवन शर्मा होते. ब्रेवेट ही स्पर्धा नसून स्वत:ला साध्य करणे हाच ब्रेवेट चा उद्देश आहे .वेळेच्या आत आव्हान पूर्ण करणारे सगळे सायकलिस्ट विजय ठरले जातात. वाशिम येथील डॉक्टरांनी यामध्ये सहभाग नोंदवून वाशिमला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यास मदत करावी असे आवाहन वाशिम रोदिनियर्स ग्रुपचे आॅर्गनाईजर नारायण व्यास यांनी केले आहे.