मयत अधिकाऱ्याचा शासकीय माहिती अधिकारी म्हणून उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:47+5:302021-03-29T04:23:47+5:30
मानोरा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात शाखा अभियंता म्हणून कार्यरत एस.टी. बिल्लारी यांचे पाच ते सहा महिन्यांपूर्वी पक्षाघाताने निधन ...
मानोरा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात शाखा अभियंता म्हणून कार्यरत एस.टी. बिल्लारी यांचे पाच ते सहा महिन्यांपूर्वी पक्षाघाताने निधन झाले. दरम्यान, एक ते दीड महिन्यांपुर्वी उपविभाग कार्यालय विश्रामगृह परिसरातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात स्थलांतरीत करण्यात आले. कार्यालयाच्या मुख्य दरवाजाच्या बाजूने माहिती अधिकाऱ्यांच्या नावाचा फलक लावण्यात आला. त्यावर शासकीय माहिती अधिकारी म्हणून प्रथम क्रमांकावर मयत अधिकारी एस.टी. बिल्लारी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्यानंतर इतर अधिकारी व अपिलीय अधिकाऱ्यांचे पदनाम दर्शविणारा तक्ता लावण्यात आला आहे. तथापि, मयत अधिकाऱ्याचे नाव माहिती अधिकाराच्या फलकावर लावण्याचा वरिष्ठांचा नेमका हेतू काय, हे कोणालाच कळले नाही.
यासंदर्भात कारंजा येथील वरिष्ठ सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे वारंवार संपर्क साधूनही त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.