मानोरा बाजार समिती : लिलाव शेडमध्ये व्यापार्यांचा माल; शेतकर्यांचा माल रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:03 IST2018-01-16T19:43:53+5:302018-01-16T20:03:17+5:30
मानोरा (वाशिम): नैसर्गीक आपत्तीपासून शेतकर्यांचा माल सुरक्षीत राहावा यासाठी कृषी उत्पन बाजार समितीच्या आवारात लिलाव शेडची उभारणी करण्यात आली. परंतु यासाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अपवाद ठरत आहे. लिलाव शेडमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार्यांचा माल ठेवल्या गेल्याने शेतकर्यांना मात्र रस्त्यावर आपला माल विक्री साठी ठेवण्याची पाळी आली आहे.

मानोरा बाजार समिती : लिलाव शेडमध्ये व्यापार्यांचा माल; शेतकर्यांचा माल रस्त्यावर!
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): नैसर्गीक आपत्तीपासून शेतकर्यांचा माल सुरक्षीत राहावा यासाठी कृषी उत्पन बाजार समितीच्या आवारात लिलाव शेडची उभारणी करण्यात आली. परंतु यासाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अपवाद ठरत आहे. लिलाव शेडमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार्यांचा माल ठेवल्या गेल्याने शेतकर्यांना मात्र रस्त्यावर आपला माल विक्री साठी ठेवण्याची पाळी आली आहे.
मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव शेडवर मोठ्या प्रमाणात व्यापार्यांचा माल ठेवल्या गेला आहे. ही परिस्थिती तिन्ही शेडवर सारखीच आहे. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो. वेळेवर नगदी पैसे मिळत असल्यामुळे बाहेरील तालुक्यातुन शेतकरी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणतात, लिलाव शेडवर व्यापार्यांचाच माल असल्यामुळे शेतकर्यांना हर्रासी साठी रस्त्यावर माल ठेवावा लागतो किंवा काही शेतकर्यांना आणलेला माल परत घेवुन जावा लागतो. सध्या मोठ्या प्रमाणात तुर विक्रीसाठी आणल्या जाते. सोयाबीनच्या हंगामाच्या वेळी हिच परिस्थिती कायम होती, त्या वेळेस बाजार समितीच्यावतीने व्यापार्यांना माल उचलण्याच्या सुचना दिल्या होत्या, परंतु त्याचा फारसा फरक पडता नसल्याचे दिसुन येत आहे. बाजार समितीवर या प्रकारावरुन व्यापार्यांचा वचक दिसून येत आहे. शेतकर्यांचे हित जोपासत असल्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या सर्वसमावेशकच्या संचालक, पदाधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकर्यांच्यावतीने होत आहे.