व्यापारी संकुलातील अतीक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:41 AM2021-05-23T04:41:12+5:302021-05-23T04:41:12+5:30

वाकद येथे भव्य स्वरूपात व्यापारी संकुल उभारण्यात आले. त्याठिकाणी पाच जणांनी अवैधरित्या अतीक्रमण करून ताबा मिळविण्याचा प्रयत्न चालविला होता. ...

Merchant package override deleted | व्यापारी संकुलातील अतीक्रमण हटविले

व्यापारी संकुलातील अतीक्रमण हटविले

Next

वाकद येथे भव्य स्वरूपात व्यापारी संकुल उभारण्यात आले. त्याठिकाणी पाच जणांनी अवैधरित्या अतीक्रमण करून ताबा मिळविण्याचा प्रयत्न चालविला होता. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित अतिक्रमणधारकांना अनेकवेळा तोंडी व लेखी स्वरूपात सूचना देऊन सुद्धा अतिक्रमण काढून घेण्यात आले नाही. त्यामुळे अखेर ग्रामपंचायतीने पोलीस व महसूल प्रशासनाच्या सहकार्याने २२ मे रोजी सकाळी १० वाजता सदर अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली. यादरम्यान काही अतिक्रमणधारकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी कुठलाही गोंधळ होऊ न दिल्याने मोहीम शांततेत पार पडली. पोलीस प्रशासनाच्यावतिने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवई, वाकद बीटचे जमादार बावस्कर यांच्यासह रिसोड पोलीस स्टेशनचा ताफा यावेळी हजर होता. तसेच मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी देवडे, वाकद ग्रामपंचायत सरपंच अमोल देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गजानन तिरके, सय्यद अकील हुसेन, शिवाजी थोरात, गोपाल चोपडे, बालाजी लाटे, गणेश मोरे, भिकाजी अंभोरे, प्रल्हाद बेंडवाले, वामन अंभोरे, शे रुऊफ बिलाल कुरेशी, वामन अंभोरे, ग्रामपंचायत सचिव एस.आर. काकडे, कर्मचारी अंबादास इंगळे, विवेक खोलगाडगे, महादेव अंभोरे यांचीही उपस्थिती होती. सदर अतिक्रमण हटवून ग्रामपंचायतीने संपूर्ण संकुल ताब्यात घेतले. यानंतर कोणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सरपंच अमोल देशमुख यांनी दिला.

Web Title: Merchant package override deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.