व्यापाऱ्यांच्या मालाने भरले ओटे; शेतकऱ्यांचे सोयाबिन रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 02:17 PM2019-11-16T14:17:21+5:302019-11-16T14:17:43+5:30
व्यापाºयांचा शेतमाल ओट्यावर आणि शेतकºयांचा माल जमिनीवर पडून राहत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतरही काही प्रमाणात शेतकºयांच्या हाती सोयाबिनचे उत्पादन आले. रब्बी हंगामातील खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी हा माल शेतकºयांनी विक्रीला आणणे सुरू केल्याने बाजार समितीत सर्वत्र सोयाबिनच दिसून येत आहे. असे असताना व्यापाºयांचा शेतमाल ओट्यावर आणि शेतकºयांचा माल जमिनीवर पडून राहत असल्याचे दिसून येत आहे.
रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ हा तालुकाच नव्हे; तर वाशिम, मालेगाव तालुक्यातील काही गावांसह हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यातूनही शेतमाल विकायला येतो. यामुळे दरवर्षी खरीप हंगाम संपल्यानंतर आणि रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रामुख्याने सोयाबिन विक्रेत्या शेतकºयांची बाजार समितीत तोबा गर्दी होते. यामाध्यमातून होणाºया खरेदी-विक्रीच्या उलाढालीतून बाजार समितीला लाखो रुपयांचा शेष प्राप्त होतो. असे असताना बाजार समिती प्रशासनाकडून शेतकºयांना अपेक्षित सोयी-सुविधा अद्यापपर्यंत पुरविण्यात आलेल्या नाहीत. बाजार समितीच्या आवारात असलेल्या ओट्यांवर सदोदित व्यापाºयांचाच माल पडून असतो. परिणामी, ऐन हंगामात शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांना नाईलाजास्तव त्यांचा माल रस्त्यावरच टाकावा लागतो. तशीच परिस्थिती सद्याही उद्भवली असून बाजार समितीने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
रिसोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत सोयाबीन या मालाची आवक अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ओट्यांवर जागा नसल्यानेच सदर माल रस्त्यावर ठेवला जात आहे. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल.
- सुमनताई माधव भुतेकर
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
सत्ताधारी व व्यापारी यांचे संगणमत असल्यानेच व्यापाºयांचा माल ओट्यांवर; तर शेतकºयांचा माल रस्त्यावर ठेवला जात आहे. ओटे हे शेतकºयांसाठी असताना त्यांचीच गैरसोय होत असून त्यास सर्वस्वी बाजार समिती प्रशासनच जबाबदार आहे. हा प्रकार तत्काळ बंद व्हायला हवा.
- डॉ. चंद्रशेखर देशमुख
संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती