पारा घसरला; बोचऱ्या थंडीने वाशिमकर हैरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:50 PM2019-12-28T12:50:56+5:302019-12-28T12:51:02+5:30

जिल्हयातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण आणि थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे.

The mercury dropped; Wasimkar surprised by the cold | पारा घसरला; बोचऱ्या थंडीने वाशिमकर हैरान

पारा घसरला; बोचऱ्या थंडीने वाशिमकर हैरान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वातावरणातील अचानक बदल होऊन तापमान १७ अंशावर गेले. गत दोन दिवसांपासून जिल्हयात थंडी वाढू लागल्याने दिवसा रस्त्यावर फिरणाºया नागरिकांच्या अंगात गरम कपडे दिसून येत आहेत. वातावरणात गारवा व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी उन्हाळा तसेच पावसाळयातही ऋतुचक्रातील बदलाचा परिणाम दिसून आला. जवळपास जुलै अखेरपर्यंत तापमानाचा जोर व उन्ह वाशिमकरांना सहन करावा लागला. एरव्ही पावसाळयाची सुरुवात जुनच्या पहिल्या आठवडयात होते आणि आॅगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यात मान्सुन परततो परंतु यंदा जुलेैच्या दुसºया आठवडयात मान्सुनचे आगमन झाले आणि आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस बरसला होता. त्यानंतरही अधून-मधून पाऊस आल्याचे दिसून आले. दसरा, कोजागिरी व दिवाळीमध्ये थंडी असायला पाहिजे होती परंतु तसे झालेले दिसून आले नाही. दिवाळीच्या दिवशी मात्र पाऊस आला होता. सद्यस्थितीत जिल्हयातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण आणि थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे. गत दोन दिवसाआधी काही भागात तुरळक पाऊसही पडला. (प्रतिनिधी)


हवामान बदलामुळे कृषी क्षेत्र अडचणीत
बदलत्या हवामानामुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतीचे होत आहे. अतिपावसाने खरिपाची, तर उष्णतेमुळे रब्बीची पिके धोक्यात येत आहेत. उष्णता वाढ असल्याने पिकांत मोठया प्रमाणावर बाष्पीभवन होते. पिकाला वेळेवर आणि गरजेपुरते पाणी उपलब्ध न झाल्यास पिीके करपून जातात. पावसाचे दिवस कमी होत असल्याने विविध पिकांच्या उत्पादनासाठी ही गोष्ट हानिकारक आहे. केवळ पेरणीनंतर पाऊस पडून गेला आणि फूल आणि फळधारणेच्या काळात पिकाला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास उत्पादनात यामुळे घट येत आहे. अति उष्णता, अती थंडी ही पिकांना घातक आहेच, शिवाय धुक्यामुळेदेखिल पिकावर रोगकिडीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते . उष्णतेमुळे दुग्ध आणि पोल्ट्री व्यवसायही अडचणीत आला होता. हवामान बदलामुळे एकूण कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.

ग्रामीण भागात शेकोटया पेटल्या
गत दोन दिवसांपासून अचानक पडत असलेल्या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोटया पेटण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे. शहरी भागातही नागरिकांच्या अंगात गरम कपडे दिसून येत आहेत.

अवेळी पाऊस आणि त्यामुळे पडणारे धुके तसेच तीव्र थंडीचा पिकांवर विपरित परिणाम होतोच, तथापि पीके कोणत्या स्थितीत आहे यावर ते अंवलंबून असते. थंडीमुळे अळयांचा प्रादूर्भाव, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होतो.
-एस.एम. तोटावार
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , वाशिम

Web Title: The mercury dropped; Wasimkar surprised by the cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.