वाशिम जिल्ह्याचा पारा ४१ अंशावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 05:59 PM2019-03-31T17:59:04+5:302019-03-31T17:59:39+5:30
वाशिम : पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांच्या तुलनेत तापमान कमी राहणाºया वाशिम जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या तीन वर्षांपासून मात्र मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांच्या तुलनेत तापमान कमी राहणाºया वाशिम जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या तीन वर्षांपासून मात्र मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. हिवाळ्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर मार्चच्या शेवटीच जिल्ह्याचा पारा तब्बल ४१ अंशावर पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पुरते हैराण झाले असून दिवसागणिक वाढत चाललेल्या प्रखर उन्हामुळे दुपारच्या सुमारास सर्वच ठिकाणचे रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्याचे तापमान पुर्वी साधारणत: ३८ ते ३९ अंशाच्या खालीच राहायचे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पर्यावरणाचा झपाट्याने झालेला ºहास, वृक्षतोडीचे वाढलेले प्रमाण यासह तत्सम कारणांमुळे उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्याचे तापमान ४० अंशाच्या पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अधिकृत ‘वेबसाईट’वर रविवार, ३१ मार्च रोजी वाशिम जिल्ह्याचे तापमान ४१ अंश नोंदविण्यात आले. वाढत्या तापमानामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून उन्हापासून बचावाकरिता डोक्यावर रुमाल, टोपी परिधान केली जात आहे. यासह ठिकठिकाणी थाटण्यात आलेल्या थंडपेयांच्या दुकानांवर सायंकाळच्या सुमारास गर्दी वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे.