१00 शाळांमधील विद्यार्थी देणार ‘बेटी बचाव’चा संदेश
By admin | Published: August 13, 2016 01:25 AM2016-08-13T01:25:21+5:302016-08-13T01:25:21+5:30
शाळेच्या माध्यमातून होणार प्रचार; एक हजार रुपये निधी प्राप्त.
प्रफुल बानगावकर
कारंजा लाड (जि. वाशिम), दि. १२: बेटी बचाओ-बेटी पढाओ व लेक शिकवाया अभियानाच्या व्यापक जनजागृतीचा एक भाग म्हणून आता १00 शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. १00 शाळेतील विद्यार्थी ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्णचा संदेश देणार आहेत.
मुलींच्या जन्मदराचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे शासनस्तराहून विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणारे उपक्रम राबविले जातात. त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाओ व लेक शिकवा या अभियांनाची व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी, या हेतूने जिल्हयातील बेटी बचाव बेटी पढाओ याकरीता ५0 व लेक शिकवा अभियान या उपक्रमाकरीता ५0 शाळेची अशा एकुण १00 शाळेची निवड या लोकजागृती उपक्रमाकरीता करण्यात आली. उपक्रम घेण्यासाठी निवड झालेल्या शाळला प्रत्येक उपक्रमास एक हजार रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जातात.
शाळेतील विदयार्थी व विद्यार्थ्यांनी यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार होण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मुबा आहे. बेटी बचाव व बेटी पढाव या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा, या दुष्टीने तालुकानिहाय प्रत्येक केंद्रातून बेटी बचाव बेटी पढाव व लेक शिकवा अभियान या दोन उपक्रमाकरीता प्रत्येकी एक हजार रुपये प्राप्त झाले आहे. त्यानुसार शाळेतील मुख्याध्यापक यांनी प्राप्त निधीतून ब्रोशर, पॅम्प्लेट, फलक, व्हिडीओ निर्मिती, पथनाटय, कला पथक, विविध सहशालेय उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यासंदर्भात सुचना शाळांना देण्यात आल्या आहेत.