गृहभेटीतून "हगणदरीमुक्ती"चा संदेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 07:14 PM2017-07-18T19:14:05+5:302017-07-18T19:14:05+5:30

वाशिम : गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा स्वच्छता कक्षाने गृहभेटीवर भर दिला असून, लवकरच जनजागृतीची मोहिम सुरू केली जाणार आहे.

Message of "Hagar Smriti" from house-to-house! | गृहभेटीतून "हगणदरीमुक्ती"चा संदेश !

गृहभेटीतून "हगणदरीमुक्ती"चा संदेश !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा स्वच्छता कक्षाने गृहभेटीवर भर दिला असून, लवकरच जनजागृतीची मोहिम सुरू केली जाणार आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वाशिम जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात शौचालय बांधकामाचे एकूण उद्दिष्ट ३५ हजार ८६५ दिले होते. प्रत्यक्षात ३६ हजारापेक्षा अधिक शौचालय बांधकाम झाले आहे. सन २०१७-१८ या वर्षात ग्रामीण भागात ७० हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ७० हजार शौचायल बांधकाम करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना आरोग्य शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. गतवर्षी हगणदरीमुक्त झालेल्या अनेक गावांमध्ये सुरूवातीलाच आजही ह्यगोदरीह्णचे दर्शन होते. हा प्रकार कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाने गुड मॉर्निंग पथक कार्यान्वित करून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे. यावर्षीपासून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. उघड्यावर शौचास जाताना आढळल्यास जवळपास १२०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यातील जवळपास ६५ नागरिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 

Web Title: Message of "Hagar Smriti" from house-to-house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.