विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:13 PM2019-09-24T16:13:25+5:302019-09-24T16:13:51+5:30
रिसोड येथे समता फाऊंडेशन व नगर परिषदेच्यावतीने स्वच्छता रॅली काढ्ण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात २४ सप्टेंबर रोजी ‘स्वछता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान कार्यशाळेतून प्लास्टिकमु्क्तीचा संदेश दिला. तसेच रिसोड येथे समता फाऊंडेशन व नगर परिषदेच्यावतीने स्वच्छता रॅली काढ्ण्यात आली.
स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र भारत सरकार द्वारा संलग्नित नेहरू युवा बहुउद्देशीय संस्था केकतउमरा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रा.डॉ. जयश्री देशमुख होत्या. यावेळी प्रा. रविंद्र पवार, प्रा. मनीषा कीर्तने, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर, कौटुंबिक हिंसाचार सल्ला व मार्गदर्शन समुपदेशक प्रभू कांबळे उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपाली देशमुख व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसेनजीत चिखलीकर यांनी केले होते. प्रास्ताविक प्रा. गजानन बारड यांनी केले. मान्यवरांचे कापडी पिशव्या देऊन स्वागत करण्यात आले.
समता फाउंडेशन व रिसोड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रिसोड शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातुन स्वच्छतेचा जागर करण्यात आला. प्रारंभी न.प.प्रांगणातुन रॅलीला न.प.अध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचा शुभारंभ झाला. सदर रॅली ही शहरातील गुजरी चौक मार्गे सराफा लाईन, आसनगल्ली, शिवाजी चौक, मार्गानी काढण्यात आली. रॅलीमध्ये वारकरी, दिंडी यांच्यासह राजस्थान प्राथमिक व माध्यमीक शाळा, ज्ञानदिप प्राथमिक शाळा, सनराईज स्कुल व न.प.शाळांनी सहभाग नोंदविला. भजनाच्या माध्यमातुन स्वच्छतेचा मुलमंत्र दिला.