‘सायकलस्वार ग्रुप’ने मुंबईकरांना दिला प्रदुषणमूक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:17 PM2017-09-08T20:17:35+5:302017-09-08T20:20:07+5:30

येथील ‘वाशिम सायकलस्वार ग्रुप’ने वाशिम ते लालबाग मुंबई असे तब्बल ६०० किमी. अंतर सायकलने पार करताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि समु्रद किनाºयावर विसर्जनानंतर इतस्त पडलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करून मुंबईकरांना पर्यावरणाचा संदेशही दिला.    

Message from pollution control given by Cyclist group to Mumbaiites | ‘सायकलस्वार ग्रुप’ने मुंबईकरांना दिला प्रदुषणमूक्तीचा संदेश

‘सायकलस्वार ग्रुप’ने मुंबईकरांना दिला प्रदुषणमूक्तीचा संदेश

Next
ठळक मुद्देवाशिम ते मुंबई ६०० कि.मी. अंतर सायकलने जुहू किना-यावर विसर्जनानंतर इतस्त पडलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:  येथील ‘वाशिम सायकलस्वार ग्रुप’ने वाशिम ते लालबाग मुंबई असे तब्बल ६०० किमी. अंतर सायकलने पार करताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि समु्रद किनाºयावर विसर्जनानंतर इतस्त पडलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करून मुंबईकरांना पर्यावरणाचा संदेशही दिला.    
वाहनाव्दरे होणारे ‘प्रदुषणमुक्तीसाठी सायकल’ या उत्तम पयार्याच्या जनजागृतीसाठी सायकलस्वार ग्रुपच्या वतीने दरवर्षी अशा मोहिमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार १ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता स्थानिक शिवाजी चौकातून या मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी या ग्रुपने २१०  किमी. अंतर पार करून चिखलठाणा येथे मुक्काम केला. दुसºया दिवशी १७० किमी सायकल चालवून राळेगणसिध्दी येथे समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. तेथे अण्णासोबत प्रदुषणावर चर्चा करुन त्यावर मात करण्यासाठी आपण काय करु शकतो याबद्दल त्यांचे मत जाणून घेतले. मग पुढचा प्रवास करत ३ सप्टेंबर रोजी  लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर जुहू बिच येथे आल्यानंतर तेथे विसर्जनानंतर इतस्त पडलेल्या गणेश मूर्ती गोळा करुन पुन्हा पाण्यात विसर्जित करुन सायकलस्वार ग्रुपने मुंबईकरांना प्रदुषणमुक्तीचा संदेश दिला. या मोहिमेमध्ये नारायण व्यास, महेश धोंगडे, सागर रावले, रेखा रावले, अक्षय हजारे व सुरज शर्मा यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Message from pollution control given by Cyclist group to Mumbaiites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.