विद्यार्थ्यांकडून रॅलीच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:46 PM2018-07-22T13:46:06+5:302018-07-22T13:47:07+5:30
आसेगाव: येथून जवळच असलेल्या कुंभी येथील व्ही. एन. शेळके शाळेच्यावतीने आषाढी एकादशीच्या औचित्यावर सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी २२ जुलै रोजी गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव: येथून जवळच असलेल्या कुंभी येथील व्ही. एन. शेळके शाळेच्यावतीने आषाढी एकादशीच्या औचित्यावर सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी २२ जुलै रोजी गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शाळेतील २५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शाळेच्या प्रांगणातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली गावातील मुख्य चौक आणि गल्लीबोळातून फिरविण्यात आली. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात आणून रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत पांडुरंग, संत गाडगे बाबा, संत नामदेव महाराज, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत रामदास आदिंची वेशभुषा धारण करून विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीचे गावात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आल. शाळेत आयोजित कार्यक्रमात धार्मिक सणउत्सव एकोप्याने साजरे करून सामाजिक एक्य वृद्धींगत करण्याचा संदेश देण्यात आला होता. या दरम्यान स्थानिक हनुमान मंदिरावरही विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. यावेळी गावातील भजन मंडळीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. शिक्षक नितीन पवार, गणेश चौधरी, संदीप राठोड, मिलिंद राठोड, कपिल राठोड, गणेश मनवर, राजेभाऊ इळे, शिक्षिका निलिमा शेळके, संगीता शेळके. पुष्पा टोपले, मंजू राठोड, नंदा मसनकर, वंदना कांबळे, शिल्पा चव्हाण यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाºयांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. शाळा समिती अध्यक्ष प्रमिला विठ्ठलराव शेळके यांनी आभार प्रदर्शन केले.