चिमुकल्यांनी दिला ‘चिमणी बचाव’चा संदेश
By admin | Published: March 22, 2017 01:02 PM2017-03-22T13:02:32+5:302017-03-22T13:02:32+5:30
पर्यावरण बालमित्रांनी सोमवारी सायंकाळी कारंजा शहरात घोषणा देत अभिनव सायकल रॅली काढली.
कारंजा : जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून स्थानिक बाबरे कॉलनीत पर्यावरण बालमित्रांनी सोमवारी सायंकाळी कारंजा शहरात घोषणा देत अभिनव सायकल रॅली काढली.
वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, जंगलतोड, घरबांधणीच्या नव्या तंत्रांमुळे सध्या चिमण्यांना घरटे बांधण्यास जागा उपलब्ध नाही. या कारणाने चिमण्यांचं प्रमाण दिवसेंदिवस घटत असल्याचे दिसून येते. कारंजा शहरातही चिमणींचे वास्तव्य कमी झाल्याचे दिसून येते. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून बाबरे कॉलनीतील चिमुकल्यांनी सायकल रॅली काढून ह्यचिमणी बचावह्णचा संदेश दिला. या रॅलीत समिक्षा देशमुख, क्षितिज खाडे, शंतनू निंघोट, तन्मय खाडे, नीरज सुरतकर, धनश्री सुरतकर, मंथन राजगुरे, अवंती खाडे, धनश्री काकडे, हर्षा काकडे, वेदांती डफडे, ओम ठाकरे, यश उमेकर, अभय गढवाले, आश्विन लाहे, ज्ञानेश्वरी बाबरे, भूमी खाडे, शहाकार, चैताली मात्रे यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सायकलीच्या मागे घोषणा फलक लावले होते. छोट्या चिमणीचे एकच मागणे, थोडे पाणी-थोडे दाणे, सुखी पर्यावरणाचे चित्र चिमणीस माना मित्र, पर्यावरण मित्राचा एकच नारा, चिमण्या पाखरांना द्या सहाराह्ण आदी घोषणा देण्यात आल्या. नागरीकांनी जागोजागी या रॅलीचे स्वागत केले. रॅलीच्या नियोजनासाठी पर्यावरण मित्र नीता खाडे, गोपाल खाडे व रॅली दरम्यान व्यवस्था व सुरक्षेसाठी संजय मानेकर, नरेंद्र खाडे, अशोकराव ताथोड यांचे सहकार्य लाभले.