नारेगाव येथे सूक्ष्म नियोजन सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:13+5:302021-08-29T04:39:13+5:30
या सप्ताहात गावाचा नकाशा ओळख, जल संधारण, अवजारे बँक, शिवार फेरी, शेतीशाळा, प्रभात फेरी, पीक उत्पादन खर्च इत्यादी कार्यक्रम ...
या सप्ताहात गावाचा नकाशा ओळख, जल संधारण, अवजारे बँक, शिवार फेरी, शेतीशाळा, प्रभात फेरी, पीक उत्पादन खर्च इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. उपस्थित शेतकऱ्यांना शेतीशाळेत शिवार फेरी घेऊन पीक परिस्थिती शेतीशाळा समन्वयक घुले व प्रक्षिशक मंगेश सुरजूसे यांनी पिकावर येणाऱ्या शत्रू कीड व मित्र-कीटकाची ओळख करून देत बोंड अळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कृषी साहाय्यक वानखडे व समूह साहाय्यक इंझळकर यांनी गाव नकाशा काढून गावाबाबत माहिती दिली व पोक्रा प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात आलेल्या घटकाबद्दल माहिती दिली. शेतीशाळा प्रशिक्षक मंगेश सुरजूसे यांनीही मार्गदर्शन केले. समन्वयक रामचंद्र घुले, शेतीशाळा प्रशिक्षक मंगेश सुरजूसे, ग्रामसेवक वैरूळकर, सूक्ष्म नियोजन समन्वयक डाॅ. गांजरे, मीरा गांजरे, कृषी सहायक विजय वानखडे, समूह सहायक निशांत इंझळकर आदींची उपस्थिती हाेती.