दुधाचे दर जैसे थे; मिठाईचे दर मात्र वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:47 AM2021-09-15T04:47:25+5:302021-09-15T04:47:25+5:30
गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. तेलाचे दर १६० रुपये प्रती किलोच्या वर गेले असताना डाळीही ...
गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. तेलाचे दर १६० रुपये प्रती किलोच्या वर गेले असताना डाळीही महागल्या आहेत. त्यामुळे तयार पदार्थांच्या दरावरही परिणाम होत असून, सणासुदीच्या काळात वाढती मागणी लक्षात घेता दुधाचे दर जैसे-थे असतानाही दुधापासून बनविल्या जाणाऱ्या मिठाईचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असून, सणासुदीच्या काळातच मिठाईचा गोडवा कमी झाल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
----------------
का वाढले दर ?
१) कोट : दुधाचे दर जैसे-थे असले तरी तेल, साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दरात मिठाई तयार करून विकणे अशक्य झाले आहे. त्यात ग्राहकांची संख्याही घटल्याने आम्हाला नाईलाजास्तव दरवाढ करावी लागली.
- पूनम बिष्णोई,
स्वीटमार्ट चालक
-----------
२) कोट : कोरोना संसर्ग काळात आमचे मोठे नुकसान झाले. आताही ग्राहकांची संख्या कमीच आहे. त्यात तेलाचे दर १६० रुपयांवर असून, साखरही पाच रुपयांनी महागली. त्यामुळे दुधाचे दर ‘जैसे थे’ असले तरी मिठाई पूर्वीच्या दरात विकणे परवडणारे राहिले नाही.
-ईश्वर मेहता,
स्वीटमार्ट चालक
०००००००००००००००००००
ग्राहक म्हणतात
१) कोट: दुधाचे आणि तेलाचे दर जैसे थे आहे; परंतु मिठाईच्या दरात मात्र प्रती किलोमागे ४० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई महागल्याने खिशाला मोठी झळ पोहोचत आहे. नियंत्रणाबाहेर गेलेल्या महागाईमुळे जीवनच कठीण झाले आहे.
- अमोल कोळकर,
ग्राहक
-----------
२) कोट : सद्य:स्थितीत ज्येष्ठा गौरी आणि गणेशोत्सवासारखे सण साजरे केले जात आहेत. या सणात प्रसाद आणि इतर कार्यक्रमांसाठी मिठाईचा वापर करावा लागतो. त्यात मिठाईचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने खर्चात वाढ झाली असून, सणवाराचा गोडवाच आता घटला आहे.
-राजेश अहिरकर,
ग्राहक
०००००००००००००००००००००००००००
मिठाईचे दर प्रतिकिलो
पेढा-
गणेशोत्सवापूर्वी ३००, सध्याचा दर ३२०
कलाकंद-
गणेशोत्सवापूर्वी ३२०, सध्याचा दर ३६०
जिलेबी-
गणेशोत्सवापूर्वी १००, सध्याचा दर १२०
मोतीचूर लाडू
गणेशोत्सवापूर्वी २००, सध्याचा दर २४०