लाखो बंजारा बांधव पोहरादेवीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:20 PM2018-12-03T13:20:03+5:302018-12-03T13:21:07+5:30
मानोरा: बंजारा बांधवांची काशी पोहरादेवी येथील नंगारा आकारातील ईमारतीच्या भुमीपुजन सोहळ्यासाठी रविवार २ डिसेंबरच्या रात्रीच देशभरातील लाखो बंजारा भाविक पोहरादेवीत डेरे दाखल झाले. त
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: बंजारा बांधवांची काशी पोहरादेवी येथील नंगारा आकारातील ईमारतीच्या भुमीपुजन सोहळ्यासाठी रविवार २ डिसेंबरच्या रात्रीच देशभरातील लाखो बंजारा भाविक पोहरादेवीत डेरे दाखल झाले. तथापि, या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने थंडीत कुडकुडत रानमाळातच त्यांनी रात्र काढली.
पोहरादेवी येथे पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत २५ कोटी रुपये किंमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. यामध्ये नंगारा आकाराच्या वस्तू संग्रहालयाचाही समावेश आहे. बंजारा संस्कृतीसह संत सेवालाल महाराजांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने ही ईमारत उभारली जाणार आहे. त्याशिवाय भक्तनिवास इमारत, प्रवेशद्वार व आवार भिंत, अंतर्गत रस्ते बांधकाम, बगीचा, तांडा व जमीन सुशोभिकरण, वाहनतळ व्यवस्था, विद्युतीकरण व खुले सभागृह यासह इतर कामांचा समावेश या विकास कामांत आहे. संत सेवालाल महाराजांच्या भुमीत होत असलेला हा सोहळाही ऐतिहासिक ठरावा म्हणून देशाच्या विविध राज्यातील लाखो भाविक रविवारी सकाळपासूनच पोहरादेवीत दाखल होण्यास सुरुवात झाली. तथापि, या ठिकाणी भाविकांसाठी कुठलीच सुविधा नसल्याने त्यांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली. अनेक भाविकांनी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.