तीन दिवसात लाखोंचा माल जप्त
By admin | Published: August 21, 2015 01:44 AM2015-08-21T01:44:21+5:302015-08-21T01:44:21+5:30
अवैध दारु विक्रीवर धाडसत्र; जिल्हय़ात कारवाई.
वाशिम : स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने अवैघ दारु भट्या, अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. १८ ते २0 ऑगस्ट या तीन दिवसाच्या दरम्यान १ लाख १ हजार ८३६ रुपयाची दारु पकडून आरोपिंवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हय़ातील अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहगव्हाण येथे दारुभट्टीवर छापा टाकून ४२ हजार रुपयांचा सडवा मोहा व साहित्य २0 ऑगस्टला जप्त करण्यात आले. तसेच १८ ऑगस्ट रोजी अमानी, तरोडी येथे २१५0 रुपयाची दारु जप्त करण्यात आली. १९ ऑगस्ट रोजी मेडशी येथे दोन ठिकाणच्या कारवाईत १ हजार ४५0, उकळीपेन २३ हजार, कृष्णा २0,४00, मंगरुळपीर ७७४0, रिठद ७५0 रुपयाची अवैध दारु व मांगुळ झनक येथे ४४४६ रुपयांची बियर व विदेशी अशी एकूण १ लाख १ हजार ८३६ रुपयांची दारु जप्त करण्यात आली. यापूर्वी १४ ते १५ ऑगस्टच्या दरम्यानही काटा व मंगरुळपीर येथे ६ हजार ५४0 रुपयांची दारु पकडण्यात आली होती. याप्रकरणी आरोपिंविरुद्ध दारुबंदी कायदय़ांतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये हिरंगी येथील मिलिंद भगत, अमानी येथे धनंजय राजाराम जाधव, तरोडी येथे भागवत नथ्थु ससाने, उकळीपेन येथे गजानन शंकर धोत्रे, हसन जगली भवानीवाले तर अनसिंग येथील धनु छकू भवानीवाले, धासू छकू भवानीवाले, सलीम रशीद नंदावाले, उस्मान हसन भवानी यांचा समावेश आहे. अनसिंग येथील प्रकरणातील आरोपी पोलिसांचा सुगावा लागताच पळून गेलेत.