सोनल प्रकल्पातील लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:40 PM2019-02-22T15:40:29+5:302019-02-22T15:40:45+5:30
मंगरुळपीर : यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता . बंधाº्याचे गेट बंद केल्यामुळे वनोजा शेत शिवारामध्ये बंधारा फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता . बंधाº्याचे गेट बंद केल्यामुळे वनोजा शेत शिवारामध्ये बंधारा फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
सोनल प्रकल्प मुबलक साठा असतांना अधिकाºयांनी रब्बीचे पिके घेण्यासाठी पाणी सोडले होते . परंतु कर्मचाºयांच्या आडमुठी धोरणामुळे मागील तीन महिन्यात सोनल प्रकल्पाचे पाणी ७५ टक्के कमी झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील हिरंगी, लाठी, एडशी, शेलुबाजार, वनोजा, नागी येथील शेतकºयांनी मागील आठ दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी करून देखील त्यांना शेतीसाठी पाणी न देता बंधाºयाचे गेट बंद करण्यात आले होते, बंधाº्याचे गेट बंद केल्यामुळे वनोजा शेत शिवारामध्ये बंधारा फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या वर्षामध्ये सलग्न तीन वेळा बंधारा फुटलेला आहे. शेतकºयांच्या हक्काचे असलेले पाणी त्यांना वापरण्यास न देता बंधाºयाचे गेट बंद केल्याने तीन वेळा मेन कालवा फुटल्याने दरवेळी लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याने शेतकº्यांमधून नाराजीचे सूर येत आहे. दरवेळी कालव्याच्या दुरुस्तीला आठ आठ दिवस लागतात. कालव्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तर दुस-या जागेवर कालवा फुटतो, यामुळे सोनल प्रकल्पाच्या कर्मचारी व अधिकाºयाप्रती शेतकरी वर्गामध्ये रोष व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन सोनल प्रकल्पापासून वनोजा साईडचे शेतकºयांच्या शेतात जाणारे मायनर बंद केलेले होते ते मायनर चालु करावे. पाणी शेतकºयांना वापरण्यासाठी घेऊ द्यावे व फुटलेल्या मेन कालव्याचे काम त्वरित पूर्ण करावे . तसेच लाखो लिटर होत असलेल्या पाण्याची नासाडी तात्काळ थांबवावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.
पिकासाठी टप्याटप्याने कालव्यात पाणी सोडण्यात आले होते, परंतु शेतकºयांनी डायरेक्ट पाणी घेण्यासाठी कालव्याला भगदाळ पाडुन पाईप टाकले होते. तेथेच कालवा फुटला असून आता तो पूर्णत: दुरुस्त केला आहे.
- अनिल डांगे
सोनल प्रकल्प अभियंता शेलुबाजार