दस-याला कोट्यवधींची उलाढाल

By admin | Published: October 13, 2016 02:00 AM2016-10-13T02:00:37+5:302016-10-13T02:00:37+5:30

वाशिम जिल्ह्याचे गत तीन वर्षांचे रेकॉर्ड मोडीत; खरेदीसाठी बाजारपेठेत उडाली झुंबड.

Millions of turnover turnover | दस-याला कोट्यवधींची उलाढाल

दस-याला कोट्यवधींची उलाढाल

Next

संतोष वानखडे
वाशिम, दि. १२- यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने, जिल्ह्यातील बाजारपेठांनी दसर्‍यानिमित्त अच्छे दिनह्णचा अनुभवला घेतला. साडेतीन मुहूर्तांंपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसर्‍यानिमित्त वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सराफा आदी बाजारपेठेत सुमारे साडेआठ ते नऊ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
गत तीन वर्षांपासून जिल्हावासियांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्यामुळे दसर्‍यानिमित्तच्या बाजारपेठेतील उलाढालही काही अंशी मंदावली होती. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावून सर्वांंनाच ह्यखूषह्ण केले. दसर्‍यापूर्वी दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठी भाविकांची मोठय़ा संख्येने बाजारपेठेत गर्दी दिसून आली. यावर्षी निसर्ग ह्यप्रसन्नह्ण असल्याची बाब हेरून व्यापार्‍यांनीदेखील ग्राहकांसाठी बाजारपेठ सज्ज ठेवली. वाशिम येथील पाटणीचौक स्थित बाजारपेठ, सराफा लाईन येथे दसर्‍याच्या दिवशी ग्राहकांची एकच गर्दी झाली होती.
गत तीन वर्षांंच्या इतिहासात यावर्षीच्या दसर्‍याची वाहन खरेदी ही विक्रम करून गेली. विविध प्रकारच्या वाहन विक्रीतून साडेचार ते पाच कोटींची उलाढाल झाल्याचा दावा शोरूम संचालकांनी केला. शहरातील एकट्या सोहन ऑटोबाईक्स शोरूममधून तब्बल ३२१ दुचाकींची विक्री झाल्याचे संचालक राम ठाकरे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. गत तीन वर्षांंतील हा उच्चांक असल्याचेही ठाकरे म्हणाले.
दसर्‍यानिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी विविध दुकानांमध्ये झुंबड उडाली होती. रेडिमेड कपड्यांनाच मागणी होती. रेडिमेड कपड्यांसोबतच विविध पॅटर्नच्या साड्याही दसर्‍यानिमित्त बाजारपेठेत आल्या आहेत. वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्यांना महिला वर्गातून मोठी पसंती असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. कापड बाजारातून ५0 ते ५५ लाखांची उलाढाल झाल्याचा दावा कापड व्यापार्‍यांनी केला.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही एलईडी टीव्ही, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, वॉशिंग मशीन, फ्रीज यासह अन्य वस्तूंची खरेदी ग्राहकांनी केली. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ४५ ते ५0 लाखांच्या दरम्यान उलाढाल झाल्याचे सांगितले जाते. यावर्षी सराफा बाजारात फारशी तेजी नसल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष उकळकर यांनी सांगितले.
विविध वस्तूंच्या खरेदीवर विविध आकर्षक योजना जाहीर होत्या. तसेच विविध अर्थसहाय्य कंपन्यांच्या सुलभ हप्त्यांचीही योजना असल्याने बाजारपेठेतील उलाढाल वाढल्याचे व्यापार्‍यांकडून सांगितले जाते.

Web Title: Millions of turnover turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.