गौण खनिज चोरी : युवकांनी रिसोड येथे मोटारसायकल रॅली काढून वेधले प्रशासनाचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 04:06 PM2018-02-01T16:06:05+5:302018-02-01T16:07:18+5:30
रिसोड - तहसिल प्रशासनाने गौण खनिज चोरीप्रकरणी कारवाईची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी युवकांनी गुरूवारी तहसिलदार राजू सुरडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. युवकांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
रिसोड - रिसोड तालुक्यातून गौण खनिजाची चोरी होत असल्याने शासनाच्या महसुलला चुना लागत आहे. या पृष्ठभूमीवर तहसिल प्रशासनाने गौण खनिज चोरीप्रकरणी कारवाईची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी युवकांनी गुरूवारी तहसिलदार राजू सुरडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. युवकांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
रिसोड तालुक्यात रेती, गिट्टी, ढब्बर आदी गौण खनिजाची चोरी होत आहे. रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. एकिकडे शासनाला विविध योजना राबविताना अब्जावधी रुपये खर्च येत आहे. शासकीय संपत्ती म्हणून घोषित असलेल्या गौण खनिजातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, रिसोड तालुक्यात गौण खनिजाची चोरी होत असल्याने तसेच एकाच पावतीवर वारंवार गौण खनिजाची वाहतूक होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी या प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याने संबंधितांचे चांगलेच फावत असल्याचे निवेदनात नमूद आहे. गौण खनिजाची वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी करण्यात यावी, गौण खनिज वाहतूकीला मुक संमती देणाºया कर्मचाºयांवरही कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवकांनी दिला. निवेदनावर संदीप इरतकर, गणेश थोरात, लक्ष्मण मगर यांच्यासह युवकांच्या स्वाक्षरी आहेत. दरम्यान, युवकांनी रिसोड शहरातून प्रमुख रस्त्यावरून मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत ५० ते ६० युवक सहभागी होते.