कृषिभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या मंत्री यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:18+5:302021-04-02T04:43:18+5:30
राधेश्याम मंत्री यांच्याकडे ८ एकर शेती असून त्यात नवनवीन प्रयोग करून जास्तीत जास्त फायदा कसा मिळविता येईल, यावर त्यांनी ...
राधेश्याम मंत्री यांच्याकडे ८ एकर शेती असून त्यात नवनवीन प्रयोग करून जास्तीत जास्त फायदा कसा मिळविता येईल, यावर त्यांनी भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते शेतात सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड करित आहेत. त्यांच्याकडे गावरान प्रजातीच्या ४० गायी असून त्यापासून उपलब्ध होणारे शेणखत व गोमूत्र यासह जीवामृत, दशपर्णी अर्क, निमार्क आदिंचा ते नियमितपणे पिकांकरिता वापर करतात. शेताच्या बाजूला ढाळीचे, मातीचे बांध, नाला खोलीकरण करून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यात ते यशस्वी झाले. यामुळे शेतशिवारातील विहीर, कुपनलिकेची पाणीपातळी कायम टिकून बारमाही पिके घेणे त्यांना शक्य झाले आहे. याच प्रयोगशिलतेची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती) हा पुरस्कार जाहीर केला आहे. दरम्यान, १ एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी त्यांच्या निवासस्थानी शेतकरी राधेश्याम मंत्री यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.