कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाशिम जिल्ह्यात केली हरभरा  व तुर पिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:29 PM2017-12-23T16:29:45+5:302017-12-23T16:32:21+5:30

वाशिम : कृषी व पणन राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन हरभरा  व तुर पिकांची पाहणी २३ डिसेंबर रोेजी केली.

Minister of State for Agriculture Sadabhau Khot inspected crops in Washim district | कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाशिम जिल्ह्यात केली हरभरा  व तुर पिकांची पाहणी

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाशिम जिल्ह्यात केली हरभरा  व तुर पिकांची पाहणी

Next
ठळक मुद्देकळंबा महाली व कासोळाच्या शेत शिवारात जावून पिकांची पाहणी केली.शेतकऱ्यांनी त्यांच्या  सत्काराचे नियोजन केला असता त्यांनी सत्कार न स्विकारता स्वत: शेतकऱ्यांचा सत्कार करुन सन्मान केला. शेतकऱ्यांसोबत पीक परिस्थिती व अडचणींवर चर्चा केली. 

वाशिम : कृषी व पणन राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन हरभरा  व तुर पिकांची पाहणी २३ डिसेंबर रोेजी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या  सत्काराचे नियोजन केला असता त्यांनी सत्कार न स्विकारता स्वत: शेतकऱ्यांचा सत्कार करुन सन्मान केला. 

२३ डिसेंबर रोजी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत वाशिम जिल्ह्याचा दौऱ्यामध्ये कारंजा, मंगरुळपीर, वाशिम, रिसोड येत असतांनी  रस्त्यामध्ये कळंबा महाली व कासोळाच्या शेत शिवारात जावून पिकांची पाहणी केली. यामध्ये वासुदेव महल्ले, विठलराव महल्ले, सुनिर्ता महल्ले या शेतकऱ्यांसोबत पीक परिस्थितील व अडचणींवर चर्चा केली.  त्यांच्या अडचणी जाणुन घेवुन ताबडतोब कृषी अधिक्षक  व तालुका कृषी अधिकाऱ्यांना अडीअडचणीसंदर्भात सुचना सुध्दा केल्यात. विशेष  म्हणजे मंत्री महोदयांनी स्वताचा  सत्कार टाळुन  वासुदेव महल्ले, विठ्ठलराव महल्ले ,व सुनिता,  महल्ले  यांचा शाल , श्रीफळ व गुलदस्ता देवुन सत्कार केला. यावेळी आमदार लखन मलीक ,भाजपा उपजिल्हाध्यक्ष लखनसिंह ठाकुर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Web Title: Minister of State for Agriculture Sadabhau Khot inspected crops in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम