‘भेटी-गाठी’साठी मिनी मंत्रालय ग्रामस्थांच्या दारी!
By admin | Published: August 22, 2016 11:59 PM2016-08-22T23:59:40+5:302016-08-22T23:59:40+5:30
शौचालय उभारण्याचा आग्रह : स्वच्छतेसाठी वाशिम जिल्हा परिषदेची संपूर्ण टीम प्रयत्नशिल.
वाशिम, दि. २२ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ह्यभेटी-गाठी स्वच्छतेसाठीह्ण या उ पक्रमाच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी सोमवारी ग्रामस्थांच्या दारी पोहचले आहेत. वाशिम तालुक्यातील सोनखास या गावांपासून या उ पक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने २२ ऑगस्ट ते २ ऑ क्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या ३५ हजार कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून देण्याचे उद्दिष्ट वाशिम जिल्हा परिषदेने निश्चित केले आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी १२ वाजता या मोहिमेस वाशिम तालु क्यातील सोनखास येथून थाटात प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पंचायत समितीचे सभापती गजानन भोने, सुभाष चौधरी, जिल्हा परिषद सदस्य हरिदास कोरडे, गटविकास अधिकारी बचुटे, पंचायत समिती सदस्य आशा गोरे, सरपंच अनुसया गोरे, उपसरपंच शोभा गोरे, डिगांबर गोरे, साहेबराव गोरे, तालुका समन्वयक विलास मोरे, संतोष बोरकर, नंदु इंगळे आदिंची उ पस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांनी गावातील घरोघरी जावून महिलांकडे शौचालय बांधण्याचा आग्रह धरला. शौचालय नसलेल्या कुटूंबांकडून शौचालय बांधण्याची तारीख घेतली. अनेक कुटुंबांनी दोन दिवसात शौचालय बांधण्याचे आश्वासन यावेळी दिले. तद्वतच शौचालयासाठी खड्डे खोदलेल्या काही कुटुंबांच्या शौचालय बांधकामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
केवळ पैसे मिळतात, या मानसिकतेने शौचालय न बांधता ती एक महत्वाची गरज समजून शौचालय उभारा व त्याचा नियमित वापर करा, असे आवाहन हर्षदा देशमुख यांनी केले. सहायक गटविकास अधिकारी कांबळे, जिल्हा कक्षाचे माहिती व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांनी अभियानाची माहिती दिली.