अल्पवयीन मुलांनी चोरल्या मोटारसायकली!
By admin | Published: March 3, 2017 08:21 PM2017-03-03T20:21:02+5:302017-03-03T20:21:02+5:30
महिनाभरात तीन मोटारसायकली चोरी केल्याची घटना गुरुवारला उघडकीस आली.
वाशिम : मोटारसायकल चालविण्याचा छंद जोपासण्यासाठी पाच लहान मुलांनी एकत्र येऊन गेल्या महिनाभरात तीन मोटारसायकली चोरी केल्याची घटना गुरुवारला उघडकीस आली. पाचही मुले अल्पवयीन आहेत.
इयत्ता आठवी ते अकरावीमध्ये शिक्षण घेणार्या मुलांना मोटारसायकल चालविण्याचा छंद जडला. हा छंद जोपासण्यासाठी त्यांच्याकडे स्वत:ची मोटारसायकल नसल्यामुळे त्यांनी शहरात गर्दीच्या ठिकाणी उभी असलेली मोटारसायकल चोरी करायची, पेट्रोल संपल्यानंतर त्या वाहनातील बॅटरी किंवा इतर पार्ट विक्री करून पुन्हा त्यामध्ये पेट्रोल भरायचे, असा नित्यक्रम त्यांनी चालू ठेवला. गेल्या महिनाभरात या पाच मुलांनी तीन मोटारसायकली चोरी केल्याचे उघडकीस आले असून तीनही मोटारसायकल (एक बॉक्सर व दोन स्प्लेंडर ) पोलिसांनी जप्त केल्या. सर्व बालगुन्हेगार (धनगरपुरा) वाशिम येथील आहेत. ही घटना उघडकीस आणण्यासाठी ठाणेदार सी.ए. कदम यांच्या मार्गदर्शनात रमेश जायभाये, राजेश बायस्कर, सतीश गुळदे, प्रशांत अंभारे व गजानन कर्हाळे यांनी प्रयत्न केले.