मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:42 PM2018-11-20T17:42:42+5:302018-11-20T17:45:52+5:30

शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे.

Mirzapur Project water misuse | मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय 

मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय 

googlenewsNext

शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे. गत आठवड्यात अज्ञात व्यक्तीने प्रकल्पातील भरमसाठ पाणी सोडल्याने लाखो लीटर पाणी बोराळा येथील आडोळ प्रकल्पात गेले. त्यामुळे येथे चौकीदार नेमणूक करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मिर्झापूर प्रकल्पाची घळभरणी यंदा पूर्ण झाली आणि या लघू सिंचन प्रकल्पात ६५ टक्के जलसाठाही झाला. त्यामुळे मिर्झापूर, घाटा, पांगरखेडा, शिरपूर, दुधाळा, वाघी येथील काही शेतकºयांंना कालव्यातून, तर काही शेतकºयांना सिंचनासाठी प्रत्यक्ष प्रकल्पातून पाणी मिळत आहे. या प्रकल्पावर दुधाळा, वाघी येथील शेतकºयांसाठी आडोळ नदीत कालवे निर्माण केले. त्या कालव्यांद्वारे गरजेनुसार मिर्झापूर प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाते. त्याचा लाभ शेतकºयांना होत आहे, परंतु प्रकल्पावर चौकीदार नसल्याने कोणताही व्यक्ती वाटेल तेव्हा पाणी सोडत आहे. गत आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीने विनाकारण प्रकल्पातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडून दिले.  परिणामी आडोळ नदीतून पाणी थेट बोराळा येथील सिंचन प्रकल्पात गेले. याबाबत लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने शिरपूर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रारसुद्धा  देण्यात आली होती. प्रकल्पाची आरक्षीत पाण्याचे मुल्य लक्षात घेता मिर्झापूर सिंचन प्रकल्पावर लवकरात लवकर कायम स्वरूपी चौकीदार देण्याची मागणी या प्रकल्पावर अवलंबून असजेल्या शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Mirzapur Project water misuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.