इसमाला ५४ हजार रुपयांनी फसविले!
By admin | Published: July 8, 2016 01:04 AM2016-07-08T01:04:54+5:302016-07-08T01:04:54+5:30
बँक अधिकारी असल्याची बतावणी करून एटीएममधून ५४ हजार रुपये परस्पर काढले.
Next
वाशिम : एका अज्ञात इसमाने मोबाइलद्वारे बँक अधिकारी असल्याची बतावणी करून हिवरा येथील केशव सरनाईक यांच्या एटीएममधून ५४ हजार रुपये परस्पर काढल्याची घटना ५ जुलै रोजी घडली. या प्रकरणी ७ जुलै रोजी केशव सरनाईक यांनी तक्रार दिल्याने वाशिम ग्रामीण पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. बँक अधिकारी असल्याचे सांगून या इसमाने बँक खाते क्रमांक व एटीएमची माहिती सरनाईक यांच्याकडून घेतली होती.
.