आमदारांनी घेतला सुजलाम, सुफलाम अभियानाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 05:56 PM2019-02-03T17:56:05+5:302019-02-03T17:56:26+5:30
कारंजा लाड (वाशिम) : भारतीय जैन संघटना व शासनाचा जलंसधारण विभाग यांच्यावतीने मानोरा व कारंजा तालुक्यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानाचा आढावा कारंजा, मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : भारतीय जैन संघटना व शासनाचा जलंसधारण विभाग यांच्यावतीने मानोरा व कारंजा तालुक्यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानाचा आढावा कारंजा, मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी घेतला. जलसंधारणाची ही चळवळ आपली समजून या कामाला गती द्यावी, अशा सूचना पाटणी यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.
भारतीय जैन संघटना व जलसंधारण विभागा यांच्यावतीने जिल्हा दुष्काळमुक्त व्हावा या हेतूने जिल्हयात १३ पोकलन व २८ जेसीबी कार्यरत आहे. त्यापैकी मानोरा व कारंजा तालुक्यात ४ पोकलन व ९ जेसीबी कार्यरत असून या कामाला गती यावी या हेतूने आमदार पाटणी यांनी कामाचा आढावा घेतला. कामाअभावी कोणतीही मशीन उभी राहू नये यासंदर्भात संबधित यंत्रनेला जबाबदार पकडण्यात येईल. भारतीलय जैन संघटना मोफत मशीन देउन जिल्हा दुष्काळ मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याकरीता आपला सहभाग असणे गरजेचे आहे, असेही पाटणी म्हणाले. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी ही आपली चळवळ समजून या कामात मदत केली पाहीजे असे मत व्यक्त केले. याप्र्रंसगी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, जि.प. लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्हि.बी.गहेरवार व उपकार्यकारी अभियंता राजेश कोठेकर, शाखा अभियंता अब्दुल सईद, राठोड, कारंजा तहसिलदार रणजीत भोसले, मानोरा तहसिलदार डॉ.सुनिल चव्हान, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, समाधान पडघान, भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ. राजीव काळे, तसेच सुजलाम सुफलाम अभियानाचे जिल्हा निरीक्षक अभिलास नारोडे, तालुका समन्वयक अक्षय सेलसुलकर, भारतीय जैन संघटनेचे प्रफुल बानगावकर यांच्यासह सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.