आमदारांनी घेतला मंगरुळपीर शहरातील पाणी टंचाईचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:25 PM2018-04-09T17:25:58+5:302018-04-09T17:25:58+5:30
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील पाणी टंचाईने भीषण स्वरुप घेतले असुन, १० ते १५ दिवसामधून एक वेळ पाणी पुरवठा होत असुन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात वाशिम - मंगरुळपीरचे आमदार लखन मलीक यांनी येथील नगर परिषदेमध्ये आढावा सभा घेतली.
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील पाणी टंचाईने भीषण स्वरुप घेतले असुन, १० ते १५ दिवसामधून एक वेळ पाणी पुरवठा होत असुन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात वाशिम - मंगरुळपीरचे आमदार लखन मलीक यांनी येथील नगर परिषदेमध्ये आढावा सभा घेतली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार लखन मलीक होते.यावेळी नगराध्यक्षा गजाला खान ,उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, मुख्याधिकारी डॉ.मेघना वासनकर,न.प.उपाध्यक्ष विरेदं्रसिंह ठाकुर हे होते. यावेळी आमदार लखन मलीक यांनी शहरातील खाजगी विहीरी, विंधन विहीरी या अधिग्रहीत करुन त्यावर सबमर्शीबल पंप, मोटारी बसवुन त्या शहरातील पाईपलाईन ला जोडण्यात याव्या , तसेच टँकरची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्यात.तसेच याकरिता आपल्या निधीमधून ३ लाख रुपये मंजुर करुन देतो, तसेच सबमर्शीबल पंप बसवितांना पाण्याची पातळी तपासुनच सबमर्शिबल पंप बसवावे, एवढी उपाय योजना करुनही पाणी टंचाई दुर होत नसेल तर जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवुन टंचाईवर मात करण्यास चर्चा करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी नगर परिषदच्या नगरसेवकांना सांगितले की, शहरात टँकरने पाणी पुरवठा झाला तर त्या त्या प्रभागातील नगरसेवकांनी स्वत: उभे राहुन पाण्याचे वितरण करावे जेणे करुन प्रत्येकाला पिण्याकरिता पाणी उपलब्ध होईल . तसेच तालुक्यातील ज्या प्रकल्पामध्ये जलाशय उपलब्ध आहे तेथुनच शहराकरिता पाणी आणण्याचे काम प्रशासन करीत आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मेघना वासनकर यांनी सांगितले की, सभेमध्ये सांगितलेल्या सर्व सुचना व उपाय योजनावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. तसेच येथे पाणी पुरवठा अभियंता नसुन पुर्णवेळ अभियंता देण्यात यावे असेही मुख्याधिकाºयांनी सांगितले. यावेळी सर्व नगरसेवकांनी पाणी टँकरची मागणी केली असता आमदार लखन मलीक यांनी ती मान्य करुन लवकरच उपाय योजना करण्याचे आदेश दिले. यावेळी नगरसेवक चंदुभाऊ परळीकर, लईक अहेमद, अनस अहेमद, अनिल गावंडे, सचिन पवार, ज्योतीताई लवटे, संगमित्रा पाटील यांचेसह सर्वच नगरसेवक व नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.