वाशिम जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांना आमदारांच्या भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 06:10 PM2018-08-18T18:10:04+5:302018-08-18T18:10:34+5:30
नुकसानाची पाहणी करण्यासाठी कारंजा-मानोरा तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटणी नुकसानग्रस्त भागांना भेटी देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गुरुवारी मानोरा तालुक्यात प्रचंड पिक नुकसान झाले, रस्ते खरडले, तसेच घरांची पडझड झाली. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कारंजा-मानोरा तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटणी नुकसानग्रस्त भागांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली असून, आर्थिक मदतीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात तब्ब्ल २० दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने रुद्र रूप धारण केल्याने मानोरा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले, तसेच घरांची पडझडही झाली. त्याशिवाय म्हसणी-इंझोरी हा रस्ताच पावसात वाहून गेला. या सर्व नुकसानाची पाहणी करण्यासाठी आमदार राजेंद्र पाटणी यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा काढला आहे. या अंतर्गत शुक्रवारी इंझोरी येथे पाहणी केल्यानंतर शनिवार १८ आॅगस्ट रोजी त्यांनी दापुरा खु. येथे भेट दिली. पावसामुळे दापुरा खु येथील विजयदत्त श्यामसुंदर यांच्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, तसेच इतर ग्रामस्थांच्या घराची व गावातील पुलाचीसुद्धा पडझड झाली. गावातील अनेक रस्ते हे वाहून गेले आहेत. या सर्व नुकसानाची माहिती गावकºयांनी आमदार पाटणी यांना दिली. यावेळी आमदार पाटणी यांनी गावकºयांशी संवाद साधत शासनाकडून तात्काक आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार डॉ सुनिल चव्हाण, पं.स. सदस्य मधुसूदन राठोड, सरपंच भारत दरेकर, चव्हाण, गजानन डहाके व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.