वाघळूद येथे रोहयो घोटाळा; १२४ बँक खाते केले सील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:37 PM2019-09-16T12:37:33+5:302019-09-16T12:37:42+5:30

मालेगाव आणि वाशिम या दोन शहरांमधील बँकांमध्ये मजुरांच्या नावे अनधिकृतरित्या उघडण्यात आलेले १२४ बँक खाते सील करण्यात आले आहेत.

MNREGA scandal at Waghlud; 124 bank accounts sealed! | वाघळूद येथे रोहयो घोटाळा; १२४ बँक खाते केले सील!

वाघळूद येथे रोहयो घोटाळा; १२४ बँक खाते केले सील!

Next

- सुनील काकडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील वाघळूद (ता.मालेगाव) ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या तीन गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामातील गैरव्यवहार सर्वप्रथम ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. दरम्यान, याप्रकरणी गठीत स्वतंत्र पथकाकडून भ्रष्टाचाराची सखोल चौकशी सुरू असून मालेगाव आणि वाशिम या दोन शहरांमधील बँकांमध्ये मजुरांच्या नावे अनधिकृतरित्या उघडण्यात आलेले १२४ बँक खाते सील करण्यात आले आहेत.
२०१५-१६ पासून वाघळूदसह मुठ्ठा आणि वाकद या तीन गावांमध्ये करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या विविध कामांमध्ये चुकीचा प्रकार अवलंबिण्यात आला. अल्पवयीन मुले, मयत झालेल्या माणसांसह कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या इसमालाही मजूर म्हणून दाखवून संबंधितांच्या नावे मस्टर काढण्यात आले. मजूरी आॅनलाईन पद्धतीने बँक खात्यात जमा होत असल्याने बँकांमध्येही बोगस खाते काढून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. याप्रकरणी वाघळूद येथील काही जागरूक नागरिकांनी ३१ जुलै २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सरपंच, रोजगार सेवक, ग्रामसेवकासह विविध बँकांच्या परस्पर समन्वयातून घडलेला भ्रष्टाचाराचा हा प्रकार उजागर केला. तसेच याप्रकरणी वाघळूदचे सरपंच कृष्णा देशमुख यांच्यासह अन्य दोषी असलेल्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तत्काळ फौजदारी स्वरूपातील गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
‘लोकमत’नेही याप्रकरणी वेळोवेळी विविधांगी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला चौकशी करण्यास बाध्य केले. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दखल घेऊन पाच अधिकाºयांचे स्वतंत्र पथक नेमले व चौकशीस सुरूवात केली.
साधारणत: महिनाभरापासून सुरू असलेल्या चौकशीत वाघळूद, मुठ्ठा आणि वाकद या तीनही गावांमध्ये झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये सुमारे ७७ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे तद्वतच बँकांमध्ये मजूरांचे बोगस खाते काढून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले असून ९ बँकांमध्ये काढण्यात आलेले अनधिकृत १२४ खाते सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. संगणमतातून झालेल्या या भ्रष्टाचारप्रकरणी वाघळूदच्या सरपंचासह रोजगार सेवक, सचिव आणि नऊही बँकांच्या व्यवस्थापकांची चौकशी सुरू असून लवकरच धडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी ‘लोकमत’ला दिली.


वाघळूदसह मुठ्ठा आणि वाकद या तीनही गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. प्रशासनाकडून मात्र थातूरमातूर चौकशी केली जात असल्याने दोषींवर कारवाई करायलाही विलंब होत आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकवेळ तक्रार सादर करून चौकशी गतीने करण्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करण्याची मागणी केली जाणार आहे. मागणीची दखल न घेतल्यास गावकरी तीव्र स्वरूपात आंदोलन करतील.
- भागवत अंभोरे, तक्रारकर्ते, वाघळूद


रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार करणाºयांची सखोल चौकशी केली जात आहे. प्राथमिक टप्प्यात ७७ लाखांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले असून बोगस बँक खाते सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. लवकरच दोषींवरही प्रत्यक्ष कारवाई होईल.
- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: MNREGA scandal at Waghlud; 124 bank accounts sealed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.