दुष्काळी भागातील उपयायोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी मनसे आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 02:06 PM2019-02-24T14:06:46+5:302019-02-24T14:06:50+5:30

वाशिम: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने जय योजना लागू केल्या असल्या तरी, जिल्ह्यात त्याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) करण्यात आला आहे.

MNS aggressor for the effective implementation of drought relief | दुष्काळी भागातील उपयायोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी मनसे आक्रमक 

दुष्काळी भागातील उपयायोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी मनसे आक्रमक 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने जय योजना लागू केल्या असल्या तरी, जिल्ह्यात त्याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) करण्यात आला आहे. या संदर्भात मनसेच्या  जिल्हा शाखेने वाशिमच्या उपविभागीय अधिकाºयांना (एसडीओ) निवेदन सादर करून दुष्काळी भागांत तातडीने आणि प्रभावीपद्धतीने उपाय योजना राबविण्याची मागणी केली आहे. 
राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी विविध सवलती लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट, कजार्चे पुर्नगठण, शेतीशी निगडीत कजार्ची वसुली स्थगिती,  कृषी पंपाच्या वीज बिला ३३.५० टक्के सुट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाईग्रस्त भागातील शेतकºयांच्या कृषीपंपाची वीज देयके वसुलीस स्थगिती आणि वीज जोडणी खंडीत न करणे, आदिंचा समावेश आहे. यातील काही योजनांची अमलबजावणी होत असली तरी, त्याचा प्रभावी अमल होत असल्याचे दिसत नाही, असे मनसेच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असून, शासनाने लागू केलेल्या सवलतीची तातडीने आणिण प्रभावी अमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याची दखल न घेतल्यास मनसेच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, कृषी सेना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील नाईकवाडी, वाशिम शहर अध्यक्ष रवि वानखेडे, शिवा इंगोले, अमोल मुळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष दीपक मोरे, अशोक इंगळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: MNS aggressor for the effective implementation of drought relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम