रोजगार व स्वयंरोजगाराच्या उपलब्धतेसाठी ‘मोबाइल ॲप’ची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:08 AM2021-05-05T05:08:13+5:302021-05-05T05:08:13+5:30
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार स्थानिक नागरिक यांना एकमेकांशी या ‘ॲप’च्या माध्यमातून तत्काळ संपर्क साधून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता मदत होईल. ...
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार स्थानिक नागरिक यांना एकमेकांशी या ‘ॲप’च्या माध्यमातून तत्काळ संपर्क साधून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता मदत होईल. या ‘ॲप’मध्ये मोबाइल दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटार मेकॅनिकल, वाहन, इलेक्ट्रीशियन, दुचाकी मेकॅनिक, फिटर, सुतार, प्लंबर, पत्रक धातू कामगार, वेल्डर, वायरमन, ऑरगॅनिक ग्रोव्हर, अकाउंट असिस्टंट, युजिंग टॅली इत्यादी क्षेत्रांचा समावेश करण्यात येणार आहे. या क्षेत्रांतर्गत प्रशिक्षितांना घरोघरी जाऊन आपल्या कुशल सेवा ‘ऑन कॉल’ उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. तरी अशा प्रकारच्या सेवा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ९६६५५२५६५१ या क्रमांकावर संपर्क साधून ‘ॲप’ची लिंक प्राप्त करून घ्यावी. तसेच या लिंकवर नि:शुल्क नोंदणी करावी. प्रशिक्षित उमेदवार वा या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षे काम करण्याचा अनुभव असणारे उमेदवार वा व्यक्तीसुद्धा आपल्या नावाची नोंदणी या लिंकचा वापर करून करू शकतात. नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांचे कौशल्याचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र तसेच त्यांचे अनुभवाचे प्रमाणपत्र तपासणीकरिता कार्यालयात यथावकाश बोलाविण्यात येईल. नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले.