महावितरणच्या १.३० लाख ग्राहकांची ‘मोबाईल’ नोंदणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 07:35 PM2017-09-07T19:35:24+5:302017-09-07T19:35:44+5:30

वाशिम - महावितरणच्या विविध सेवा व सुविधांचा लाभ घरबसल्या मिळविण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील १.३० लाख ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. 

'Mobile' registration of 1.30 lakh subscribers of MSEDCL! | महावितरणच्या १.३० लाख ग्राहकांची ‘मोबाईल’ नोंदणी !

महावितरणच्या १.३० लाख ग्राहकांची ‘मोबाईल’ नोंदणी !

Next
ठळक मुद्देविविध सेवा व सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधासुद्धा उपलब्ध मोबाईल अ‍ॅपद्वारे मीटरचे रीडिंग महावितरणला थेट पाठवू शकणार 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - महावितरणच्या विविध सेवा व सुविधांचा लाभ घरबसल्या मिळविण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील १.३० लाख ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. 
वीजबिलाची माहिती, खंडित वीज पुरवठा, मीटर रिडिंग, वीज बिलाचा भरणा यासह अन्य वीज सेवेसंदर्भात ग्राहकांना थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाते. ग्राहकांना सोयीनुसार इंग्रजी किंवा मराठी भाषेतही एसएमएस सेवा उपलब्ध करून दिली आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर वीज बिलाची एकूण रक्कम, देय तारीख याची माहिती दिली जाते. मोबाईलवर प्राप्त सदर एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. मीटरचे रीडिंग घेतल्यानंतर दिनांक व घेतलेले मीटर रीडिंग तसेच खंडित वीजपुरवठा, भारनियमन, संबंधित वीज पुरवठा बंद व सुरु होण्याची वेळ याची माहितीदेखील एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहे. मीटरचे रीडिंग उपलब्ध न झाल्यास त्याला याचा एसएमएस प्राप्त होणार असून त्यानंतर ग्राहक दिलेल्या कालावधीत मोबाईल अ‍ॅपद्वारे मीटरचे रीडिंग महावितरणला थेट पाठवू शकणार आहेत. त्यामुळे ग्राहकाला योग्य देयक मिळणार असून तत्काळ आॅनलाइन भरणा करता येणार आहे.  मोबाईल क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना कुठल्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर वैयक्तिक व  इतर  माहिती नोंद असल्यामुळे फक्त तक्रार सांगावी लागणार आहे. वाशिम मंडळातील १ लाख ३० हजार ७६४ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी  केली असून इतर ग्राहकांनी सुद्धा आपला मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: 'Mobile' registration of 1.30 lakh subscribers of MSEDCL!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.