अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे माेबाईल वापसी आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:16+5:302021-08-20T04:48:16+5:30

प्रकल्प अधिकारी मानोरा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना १० ऑगस्ट व १८ ऑगस्टला निवेदन देऊन अंगणवाडी कामकाजासाठी शासनाने दिलेला ...

Mobile return of Anganwadi staff | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे माेबाईल वापसी आंदाेलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे माेबाईल वापसी आंदाेलन

Next

प्रकल्प अधिकारी मानोरा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना १० ऑगस्ट व १८ ऑगस्टला निवेदन देऊन अंगणवाडी कामकाजासाठी शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते जुने झाल्यामुळे सतत नादुरुस्त होतो व त्यांच्या दुरस्तीकरिता खर्च येतो व तो सेविकांकडून वसूल केला जातो. दिलेला मोबाईल परत घ्यावा व नवीन चांगला मोबाईल द्यावा तसेच केंद्र सरकारने लादलेला पोषण ट्रॅकर ॲप हा सदोष असून तो रद्द करावा, मदतनिसांना प्रोत्साहन भत्ता नियमित द्यावा व त्यामधे वाढ करावी, कर्मचाऱ्यांना अरिरिक्त प्रभार न देता रिक्त पदे भरावी आदी मागण्यांचे निवेदन दिले हाेते. मागण्या मान्य केल्या नाही तर १७ ऑगस्टपासून कधीही मोबाईल वापसी आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला हाेता , त्यानुसार आंदाेलन सुरू करण्यात आले. निवेदनावर प्रमिला उजवे, आर. वाय. इंगोले, शीला डेरे, शोभा भगत, भाग्यश्री डेरे, अन्तकला मनवर आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Mobile return of Anganwadi staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.