मोबाइल चोर ठरला अक्षयच्या मृत्यूस कारणीभूत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:08 AM2017-09-06T01:08:28+5:302017-09-06T01:09:15+5:30

इंझोरी: येथील रहिवासी गोपाल राऊत यांचा मुलगा अक्षय राऊतचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात एका मोबाइल चोरट्या मुलाने रेल्वे धावत असताना हातून मोबाइल हिसकावल्याने अक्षयचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. अफजल गणी (१७) असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळले आहे. 

A mobile thief has caused Akshay's death | मोबाइल चोर ठरला अक्षयच्या मृत्यूस कारणीभूत 

मोबाइल चोर ठरला अक्षयच्या मृत्यूस कारणीभूत 

Next
ठळक मुद्दे२२ ऑगस्ट रोजी रेल्वेतून पडल्याने अक्षयचा मृत्यू रेल्वे धावत असताना मोबाइल हिसकल्यामुळे घडली घटनाबडनेरा रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी: येथील रहिवासी गोपाल राऊत यांचा मुलगा अक्षय राऊतचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात एका मोबाइल चोरट्या मुलाने रेल्वे धावत असताना हातून मोबाइल हिसकावल्याने अक्षयचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. अफजल गणी (१७) असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळले आहे. 
मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील अल्पभूधारक शेतकरी गोपाल राऊत यांचा थोरला मुलगा अक्षय राऊत (२२) याचा २२ ऑगस्ट रोजी बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली चिरडल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करणार्‍या रेल्वे पोलिसांनी काळजीपूर्वक चौकशी करून पुरावे मिळविले आणि त्या पुराव्यांचा आधारे तपासाची चक्रे फिरविली. यामध्ये बडनेरा रेल्वे स्टेशनवरून रेल्वे निघाल्यानंतर काही अंतरावर रेल्वे डब्याच्या गेटवर बसलेला अक्षय मोबाइलवर मेसेज पाहत असताना खाली असलेल्या अफजलने अक्षयच्या हातचा मोबाइल हिसकावला. त्यामुळे अक्षयचा तोल जाऊन तो खाली पडला आणि रेल्वेखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला, असे उघड झाले. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांच्यावतीने अल्पवयीन असलेल्या अफजलवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरूच होती. दरम्यान, आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरोधातील खटला हा बाल न्यायालयात चालणार असल्याचे बडनेरा रेल्वे पोलीस निरीक्षक पी. व्ही. चक्रे  यांनी सांगितले. 

Web Title: A mobile thief has caused Akshay's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.