शेताच्या बांधावर पोहोचणार आधुनिक तंत्रज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:27+5:302021-06-18T04:28:27+5:30
२१ जून ते १ जुलै २०२१ दरम्यान प्रत्येक कार्यालयीन दिवशी कृषी क्षेत्राशी निगडित महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर दिला जाणार ...
२१ जून ते १ जुलै २०२१ दरम्यान प्रत्येक कार्यालयीन दिवशी कृषी क्षेत्राशी निगडित महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर दिला जाणार आहे. याअंतर्गत २१ जून रोजी बी.बी.एफ. तंत्रज्ञान-रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान, २२ जून रोजी बीज प्रक्रिया, २३ जून जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, २४ जून एक गाव-एक वाण असणाऱ्या क्षेत्रासाठी सुधारित पीक लागवड तंत्रज्ञान, २५ जून रोजी ‘विकेल ते पिकेल’ अभियान, २८ जून रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, २९ जूनला तालुक्यातील दोन पिकांत उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, ३० जून रोजी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना व १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
....................
व्हाॅट्सॲपद्वारे प्रचार, प्रसार
या मोहिमेत कृषी विद्यापीठाचे संशोधित व अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा मानस आहे. तसेच कृषी विभागाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती या मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. प्रगतशील शेतकऱ्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपद्वारे योजनेचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. यूट्यूब चॅनेलवर प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा चित्रफितीही दाखविण्यात येणार आहेत.