मोहगव्हाण, उध्र्व मोर्णा प्रकल्पातून होणार सिंचन
By admin | Published: November 8, 2016 02:06 AM2016-11-08T02:06:39+5:302016-11-08T02:06:39+5:30
रब्बी हंगामातील पिकांना मिळणार फायदा; शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन.
वाशिम, दि. ७- जिल्ह्यातील मोहगव्हाण, उध्र्व मोर्णा या लघुपाटबंधारे योजनांमधून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. याकरिता शेतकर्यांनी पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून अर्ज सादर करावे, असे आवाहन अकोला लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतांनी सोमवारी केले.
सदर प्रकल्पांमधून रब्बी हंगाम २0१६-१७ चे नियोजन करण्यात आले आहे. उध्र्व मोर्णा प्रकल्पांतर्गत येणार्या लाभार्थींंंनी आपल्या क्षेत्रातील केवळ मंजूर क्षेत्राकरिताच पाणी मागणी अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंंंत संबंधित उपविभागीय कार्यालयाकडे प्रत्यक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने पाठवावेत. मोहगव्हाण प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाणीवाटप संस्थेकडे हस्तांतरित झाले असल्यामुळे या प्रकल्पावरील लाभधारकांनी आपल्या क्षेत्रातील पाणीवापर संस्थेकडे अर्ज भरणे आवश्यक आहे.
हरभरा, तूर, करडी, सूर्यफूल आदी कमी पाणी लागणार्या पिकांना प्रामुख्याने प्राधान्य देण्याचे नियोजन आहे. कोणत्या धरणावर, कोणत्या कालव्यावर, कोणत्या गेटपयर्ंत पाणी मिळू शकेल, याबाबतची सविस्तर माहिती संबंधित उपविभागाशी, पाणी वापर संस्थेशी संपर्क करून घ्यावी. पाणी मागणी अर्ज असणे आवश्यक आहे. पाणी मागणी अर्ज करणारा शेतकरी स्वत: शेतीचा मालक असणे आवश्यक आहे. कुळ अगर वहीतदार असलेल्या शेतासाठी मागणी अर्जांंंसोबत मालकाचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. थकबाकीदार अर्जदारांना सिंचनासाठी पाणी पुरविले जाणार नाही.