मोहफुलप्रकरणात कारंजातील दोघांची चौकशी

By admin | Published: August 11, 2015 12:39 AM2015-08-11T00:39:06+5:302015-08-11T00:39:06+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

In the Mohphul Prakashan, two inquiries into Karanja | मोहफुलप्रकरणात कारंजातील दोघांची चौकशी

मोहफुलप्रकरणात कारंजातील दोघांची चौकशी

Next

कारंजा (जि. वाशिम) : कोणतेही कागदपत्न नसणारा मोहफुलाचा एक ट्रक अमरावती जिल्ह्यातील मध्यप्रदेषच्या सीमेवर असलेल्या कारंजा बहिरम नाक्यावर पकडण्यात आला होता. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारंजात चौकशीकरीता येउन येथील दोन जणांना चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची घटना १0 ऑगस्ट रोजी घडली. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात मोहफूल घेऊन आलेला एमपी 0४ एचई १३८ क्रमांकाचा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. ८) रात्नी कारंजा बहिरम नाक्यावर पकडला होता. या ट्रकमध्ये असलेल्या मोहफुलाबाबत कोणत्याही प्रकारचे कागदपत्ने नसल्यामुळे पथकाने ट्रकसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला . यावेळी अशोक बालकिसन मालवी (वय ५५) रा. मालवी, शहापूर, बैतूल या ट्रकचालकास अटक करण्यात आली. दरम्यान, ५ लाख ६0 हजार रुपयांचे मोहफूल व १३ लाख रुपयांचा ट्रक, असा १८ लाख ६0 हजारांचा ऐवज राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून अमरावतीला आणला. मोहफुलाचा ट्रक मध्यप्रदेशमधील निलेष नायक रा.भवरा जि.बैतूल येथून अमरावती मार्गे कारंजा (लाड) येथील एका व्यावसायीकाकडे जात होता. पण कारंजा येथील मोहफुलाच्या खरेदीदाराचे नाव माहित नसल्याचे ट्रक चालकाने सांगीतले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी न्यायालयाकडून ट्रक चालकाची पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळविली. पोलीस कोठडीत आरोपीने कारंजा येथील मोहफुल खरेदीदाराचे नाव माहीत नसले तरी पत्ता माहित असल्याची माहिती दिली. त्यावरून १0 ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारंजात धडक दिली व या प्रकरणात मोहफुलाचा व्यवसाय करणारे कमलकिषोर बगडे व अजय कमलकिषोर बगडे यांची चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी मोहफुलाचा ट्रक त्यांचाच असल्याची कबूली दिली. त्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोघांनाही चौकशीसाठी पुढील तपासाकरिता अमरावती येथे घेवून गेले. ११ ऑगस्ट रोजी या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहीती पथकातील अधिका-यांनी दिली. या दोन्ही व्यक्तिंवर मुंबई दारूबंदी १९४९ चे कलम ६९,८१,८३ अन्वये कारवाई करण्यात आल्याचे पथकातील अधिका-यांनी सांगीतले.

Web Title: In the Mohphul Prakashan, two inquiries into Karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.