शेकडो वर्षांची परंपरा जोपासताहेत मोहरीवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 07:52 PM2017-08-10T19:52:29+5:302017-08-10T19:54:08+5:30

Mohriyas are growing hundreds of years of tradition | शेकडो वर्षांची परंपरा जोपासताहेत मोहरीवासी

शेकडो वर्षांची परंपरा जोपासताहेत मोहरीवासी

Next
ठळक मुद्देनागपंचमीला मकराची स्थापना करुन पूजा अर्चा करण्याची परंपरा मोहरीवासी जपताहेत परंपरासमारोपाच्या दिवशी महाप्रसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी येथे शेकडो वर्षांपासून नागपंचमीला मकराची स्थापना करुन पूजा अर्चा करण्याची परंपरा मोहरीवासियांकडून जोपासल्या जात आहे. सदर उत्सव एक महिना चालत असून समारोपाच्या दिवशी भव्य असा महाप्रसाद कार्यक्रम पार पाडल्या जातो.
मोहरी येथे शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा जोपासत मोहरी येथील युवकांनी पुढे तेवत ठेवली आहे. नागपंचमीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात एका मकराची स्थापना केली जाते व लक्ष्मण शिंगाडे यांच्या घरी परंपरेने मकराची स्थापना केली जाते. स्थापनेनंतर मकराची आरती पुजाअर्चा केली जाते. त्यानंतर सर्व युवा मंडळी ढोल टाळच्या व बाºयाचा  सुरात वारुळाला पुंजनासाठी जातात, त्यानंतर रात्री रात्रभर बाºया म्हणतात व दुसºया दिवशी सकाळी मकराची गावातून वाजत गाजत मिरवणुक काढतात. गावातील नागरिक महिला मंडळ यांची जागोजागी पुजा करतात,  व दर्शन घेतात. या उत्सवामध्ये नवीन युवापिढीचा जास्त पुढाकार दिसत आहे हा उत्साह जवळपास १ महिन्याचा असतो. मोहरी येथील तलावात विसर्जन करणे व विसर्जनानंतर गावामध्ये मोठया प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात येते. यावर्षीही या उत्सवाला सुरुवात झाली असून याच्या यशस्वीतेसाठी भगवान म्हातारमारे, विठु डाखोरे,  सुभाषआप्पा हवा, लक्ष्मण शिंगाडे, सूनिल मिसाळ, दिलीप मिसाळ, किशोर जाधव, रामा भोजने, अंकुश कदम, गजानन भावके, गजानन चव्हाण, नरेश पाटील, जाधव  यांच्यासह ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत

Web Title: Mohriyas are growing hundreds of years of tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.