सास-याकडून सुनेचा विनयभंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:34 AM2017-07-31T01:34:06+5:302017-07-31T01:34:42+5:30

मालेगाव: वडिलाचे घर सोडून लग्नानंतर सासरी नांदणारी मुलगी तिच्या पतीच्या वडिलांना अर्थात सासºयालाच वडिलांच्या भूमिकेत अनुभवत असते; मात्र याच पवित्र समजल्या जाणाºया नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे २९ जुलैच्या रात्री घडला.

Molestation from father-in-law | सास-याकडून सुनेचा विनयभंग!

सास-याकडून सुनेचा विनयभंग!

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: वडिलाचे घर सोडून लग्नानंतर सासरी नांदणारी मुलगी तिच्या पतीच्या वडिलांना अर्थात सासºयालाच वडिलांच्या भूमिकेत अनुभवत असते; मात्र याच पवित्र समजल्या जाणाºया नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे २९ जुलैच्या रात्री घडला. आरोपी सासºयाने सुनेला माझी पत्नी हो, असे म्हणत तिचा विनयभंग केला. यासंदर्भात प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस ३० जुलै रोजी अटक केली आहे.
पीडित महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की तिच्या सासºयाने २९ जुलैच्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घरात झोपलेली असताना चक्क लाथ मारून उठविले. तुझ्यामुळेच माझा मुलगा तुरुंगात गेला, आता तू माझी पत्नी हो, असे म्हणत विनयभंग केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी सासºयास तडकाफडकी अटक करून त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी मालेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Molestation from father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.