मनीवाइज वित्तीय साक्षरता कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:42+5:302021-05-20T04:44:42+5:30
मनीवाइज सेंटर मालेगांव व पोस्ट ऑफिस शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वेबिनार कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक डी.के. सरनाईक (उप डाकपाल ...
मनीवाइज सेंटर मालेगांव व पोस्ट ऑफिस शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वेबिनार कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक डी.के. सरनाईक (उप डाकपाल शिरपूर) उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक विनोद जाधव यांनी केले. त्यांनी ऑनलाइन वेबिनारचा उद्देश सांगितला. वित्तीय साक्षरता बरोबरच बँक सेवा सुविधा, पोस्ट सेवा सुविधा, तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. डी.के. सरनाईक यांनी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालू असलेल्या सेवा तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवा संदर्भात मार्गदर्शन केले. संचालन विनोद जाधव व आभार परमेश्वर साबळे यांनी मानले. सदर वेबिनारचे आयोजन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे सहाय्यक व्यवस्थापक शंकर कोकणवाड, क्रिसील फाउंडेशनचे राज्य व्यवस्थापक शक्ती भिसे, मनिवाइज जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.