पावसाळ्यापूर्वी भोपळपेंड नदीच्या नाल्यांचे खोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:00 PM2019-06-07T15:00:26+5:302019-06-07T15:00:46+5:30
आसेगाव (वाशिम) : पावसाळा तोंडावर आला असताना भोपळपेंड नदीला जोडणाºया नाल्यांना पूर येऊन शेतकºयांचे नुकसान व दळणवळण ठप्प होऊ नये म्हणून महसूल विभागाच्यावतीने या नाल्यांतीन गाळ, कचरा काढून त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम) : पावसाळा तोंडावर आला असताना भोपळपेंड नदीला जोडणाºया नाल्यांना पूर येऊन शेतकºयांचे नुकसान व दळणवळण ठप्प होऊ नये म्हणून महसूल विभागाच्यावतीने या नाल्यांतीन गाळ, कचरा काढून त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी दलेलपूर आणि नांदगावदरम्यान वाहणाºया भोपळपेंड नदीला आसेगाव परिसरातील सार्सी, नांदगाव, आसेगाव आणि चिंचोली परिसरातील अनेक नाले जोडले आहेत. या नाल्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई झालेली नाही. या नाल्यात गाळ, कचरा साचला आहेच शिवाय नाल्यांत झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्यांना पूर येऊन मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्याचा फटका संबंधित गावांतील लोकांना सहन करावा लागतो. गंभीर आजारावर उपचारासाठी तातडीने शहराच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. त्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची भिती असते. शिवाय खरीप हंगामात शेतीसाठी विविध साहित्यांची नेआण करणाºया शेतकरी, शैक्षणिक प्रवास करणारे विद्यार्थी, महत्त्वाच्या कामांसाठी शहरात जाणाºया ग्रामस्थांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच नाल्याकाठच्या शेतांत पाणी घुसल्याने शेतकºयांचे अतोनात नुकनसान होते. ही समस्या दूर करण्यासाठी महसूल विभागाने पावसाळ्यापूर्वी भोपळपेंड नदीला जोडणाºया आसेगाव-धानोरा मार्गावरील पुल, तसेच नांदगावनजिकच्या नाल्यांसह प्रत्येक नाल्यातील गाळ आणि कचरा काढण्यासह या नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या नाल्यांना पूर न येता पावसाचे पाणी थेट नदीपात्रात पोहोचणार आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळीही वाढणार असून, लोकांची वाहतुकीची समस्या दूर होणार आहे. तथापि, या नदीला जोडणाºया नाल्यावर मंगरुळपीर-अनसिंग मार्गावर शिवणी आणि नांददरम्यान असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने येथील समस्या दूर होणार नाही. त्यामुळे या पुलाची उंची वाढविणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
शिवणीच्या ग्रामस्थांनी केले होते आंदोलन
भोपळपेंड नदीवर नांदगावनजिक असलेला पूल, तसेच इतर नाल्यांचे अनेक वर्षांपासून खोलीकरण न केल्याने या नाल्यांना पूर येऊन दरवर्षी शेतात पाणी घुसते. त्यामुळे पिके वाहून जातात आणि शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. प्रशासनाने ही समस्या दूर करण्यासाठी नाल्यांचे खोलीकरण करावे, या मागणीसाठी महिनाभरापूर्वी शिवणी दलेलपूरसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मंगरुळपीर तहसील कार्यालयासमोर आंदोलनही केले होते.