मूग, उडिदाच्या हमीभावाच्या नियमाला कोलदांडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:45 AM2017-09-29T01:45:43+5:302017-09-29T01:46:38+5:30

वाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मुगाला हमीभावापेक्षा  अल्प दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे ‘बजेट’ कोलमडत  आहे. हमीभावाने मूग व उडिदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड  केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा, अशी सूचना  आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग  अधिकार्‍यांना केली. 

Moong, Udayadera the threat of collusion! | मूग, उडिदाच्या हमीभावाच्या नियमाला कोलदांडा!

मूग, उडिदाच्या हमीभावाच्या नियमाला कोलदांडा!

Next
ठळक मुद्देबाजार समित्यांमधील चित्र नाफेड केंद्राबाबत अधिकार्‍यांमध्ये पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मुगाला हमीभावापेक्षा  अल्प दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे ‘बजेट’ कोलमडत  आहे. हमीभावाने मूग व उडिदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड  केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा, अशी सूचना  आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग  अधिकार्‍यांना केली. 
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकर्‍यांना पावसाची योग्य प्रमाणात  साथ मिळाली नाही. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर  अल्पावधीतच पाऊस गायब झाला. त्यानंतरही पावसात सातत्य  नसल्याने काही शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. ऐन  शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यामुळे मूग  व उडिदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट आली. नैसर्गिक संकटे  झेलत असतानाच, आता मानवनिर्मित चक्रव्यूहात बळीराजा  अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. २0१७-१८ या हंगामातील  मूग व उडीद बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. मूग पिकाला  ५३७५ रुपये दर व २00 रुपये बोनस असा एकूण ५५७५ रुपये  हमीभाव तर उडीद पिकाला ५२00 रुपये दर व २00 रुपये बोनस  असा एकूण ५४00 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.  या हमीभावानुसार चांगल्या दर्जाच्या उडीद व मुगाची बाजार  समितीत खरेदी होणे अपेक्षित आहे; मात्र कोणत्याच दर्जाच्या  मूग व उडिदाची खरेदी बाजार समितीत हमीभावाने सुरू  नसल्याचे वास्तव आहे. हमीभावापेक्षा थोड्याफार कमी फरकाने  मूग व उडिदाची खरेदी झाली तरीदेखील शेतकर्‍यांना फारसा  तोटा होणार नाही; मात्र हमीभावापेक्षा तब्बल एक हजार ते  १३00 रुपयांपेक्षा कमी दराने उडीद व मुगाची खरेदी होत  असल्याने शेतकर्‍यांचे संपूर्ण बजेट कोलमडून जात आहे. शे तमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी  मागणी सर्वांकडूनच केली जाते. अद्यापही उत्पादन खर्चावर  आधारित भाव मिळत  नाही. कधी ओला तर कधी कोरड्या  दुष्काळाचे दुष्टचक्र भेदून कष्ट करणार्‍या  बळीराजाला सुरुवा तीला पेरलेले उगवेल का, याची चिंता असते. जे उगवले ते  कवडीमोलाने विक्री होत असल्याची वेदना घेऊनच वाटचाल  करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. शेतकर्‍यांचा शेतमाल  बाजारात आला की गगनाला भिडलेले भाव तळाशी येतात, हा  दरवर्षीचा अनुभव आताही शेतकर्‍यांना येत आहे. अल्प भाव  मिळत असल्याने लागवड खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ  बसविण्यात शेतकर्‍यांची झोप उडाली आहे.
गुरुवारी जिल्हय़ातील बाजार समितींमधील उडीद व मुगाच्या  बाजारभावावर नजर टाकली असता, हमीभावापेक्षा १२00 रु पयांनी खरेदी सुरू असल्याचे दिसून आले. उडिदाला ३५00 ते  ४२0१ रुपये तर मुगाला ४000 ते ४४00 रुपये क्विंटल असा  बाजारभाव होता. मुगाची आवक ७५0 क्विंटल तर उडिदाची  आवक २७५0 क्विंटल होती. 

नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा!
शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने वाशिम जिल्हय़ात  आधारभूत किमतीने उडीद व मुगाची खरेदी होण्यासाठी नाफेड  केंद्र सुरू करावे, अशी मागणी वाशिम बाजार समितीचे संचालक  राजू चौधरी यांनी १३ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक रमेश  कटके यांच्याकडे केली होती. याची दखल घेत कटके यांनी आ ता जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांशी संपर्क साधून, पत्रव्यवहार  केला आहे. नाफेडमार्फत मूग व उडिदाचे हमीभाव खरेदी केंद्र  सुरू करण्याबाबत प्रधान कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा,  अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग  अधिकार्‍यांना पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Moong, Udayadera the threat of collusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.