दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक; आदेश धाब्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 07:05 PM2020-06-29T19:05:37+5:302020-06-29T19:05:51+5:30
आता पुन्हा दुकानांमध्ये गर्दी होत असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकाचवेळी दुकानात प्रवेश नको, या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघनही होत आहे.
- निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : शहरात १२ जूनला कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर खबरदारी म्हणून व्यापाºयांनी १४ ते १७ जून या दरम्यान दुकाने बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. परंतू, आता पुन्हा दुकानांमध्ये गर्दी होत असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकाचवेळी दुकानात प्रवेश नको, या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघनही होत असल्याचे २९ जून रोजी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.
१२ जूननंतर शहरात कोरोनाचे एकूण सहा रुग्ण आढळले होते. या रुग्णांनी कोरोनावर मात केले. पुढील दक्षता म्हणून मध्यंतरी दुकानदारांनी १४ ते १७ जून या दरम्यान बाजारपेठ बंदही ठेवली होती. कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दुकानांमध्ये एकाचवेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देऊ नये, सॅनिटायझर व तापमापक ठेवावे असे आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी रिसोड शहरातील अनेक दुकानांमध्ये होत नसल्याचे सोमवारी दिसून आले. यामुळे कोरोना विषाणू संसगार्चा धोका नाकारता येत नाही.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर दुकानांमध्ये गर्दी करू नये, तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. नियमाचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दुकानदारांनी स्वत: दक्षता घ्यावी अन्यथा नगर परिषदेच्या पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. - गणेश पांडे
मुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड