अधिक वसुलीचे फिडरही भारनियमनाच्या विळख्यात!

By Admin | Published: May 9, 2017 02:21 AM2017-05-09T02:21:24+5:302017-05-09T02:21:24+5:30

वीज पुरवठय़ाचे नियोजन करण्यात महावितरण अपयशी.

More Recovery Fidder Revealed! | अधिक वसुलीचे फिडरही भारनियमनाच्या विळख्यात!

अधिक वसुलीचे फिडरही भारनियमनाच्या विळख्यात!

googlenewsNext

वाशिम : महावितरणकडून "ए" पासून "जी" पर्यंत ग्रुपनिहाय फिडरवरून ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. त्यापैकी साधारणत: "ए", "बी", "सी" आणि "डी" या चार ग्रुपच्या फिडरवर वसुलीचे प्रमाण तुलनेने अधिक राहत असल्याने विजेचे भारनियमन केले जात नाही. मात्र, वाढत्या तापमानामुळे यंदा अधिक वसुलीच्या या फिडरवरही सहा ते सात तासांचे "फोर्स लोडशेडिंग" केले जात आहे. याशिवाय इतरही ग्रुपवर अतिरेकी तथा अघोषित भारनियमन सुरू असून, वीज पुरवठय़ाचे नियोजन करण्यात महावितरण सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे २ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. ५४ गावठाण फिडरवरून ग्रामीण भागात; तर ९ फिडरवरून शहरी भागात वीज पुरवठा केला जातो. त्यापैकी केवळ १४ फिडर ए,बी,सी,डी या प्रवर्गात मोडतात; तर २७ फिडर इ, एफ आणि १२ फिडर जी-१, जी-२, जी-३ या प्रवर्गात मोडत असल्याने संबंधित फिडरवरील ग्राहकांना भारनियमनाचा अधिक त्रास सोसावा लागत आहे.
जिल्ह्यात ४८ हजारांच्या आसपास ग्राहकांकडे एप्रिल २0१७ अखेर सुमारे २0 कोटी रुपये थकबाकी असून, ती वसूल करण्यात महावितरण बहुतांशी अपयशी ठरली आहे. त्यामुळेच ह्यडेंजर झोनह्णमध्ये असणार्‍या ह्यइह्ण पासून ह्यजी-३ह्ण पर्यंतच्या ग्रुपमध्ये अधिक ग्राहकांचा समावेश झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कृषिपंपाच्या वीज पुरवठय़ातही कपात!
विजेची वाढती मागणी आणि पुरवठय़ाचा मेळ घालण्यात अडचणी येत असल्याचे कारण समोर करत महावितरणने कृषिपंपाच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार, कृषिपंपांना यापुढे दिवसा ८ तास व रात्री ८ तास अशा दोन टप्प्यांमध्ये रात्री १ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंतच वीज मिळणार आहे. त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांच्या उन्हाळी पिकांवर जाणवणार असून, तुलनेने अधिक पाणी आवश्यक असणारे भुईमूग हे पीक धोक्यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात सध्या सुरू असलेले भारनियमन आटोक्यात आणण्याचे पुरेशे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विजेच्या वाढत्या मागणीमुळे ही बाब शक्य होत नसून, अधिक वसुलीच्या फिडरवरही ह्यफोर्सह्ण भारनियमन करावे लागत आहे.
- दीपक मेश्राम
कार्यकारी अभियंता, महावितरण

Web Title: More Recovery Fidder Revealed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.