दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

By संतोष वानखडे | Published: February 18, 2024 01:58 PM2024-02-18T13:58:35+5:302024-02-18T13:58:54+5:30

इयत्ता पाचवी आणि आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा देता येते.

More than two thousand students appeared for the scholarship exam | दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

वाशिम : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातील १८ केंद्रांमध्ये पार पडली असून, २०८६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली.

इयत्ता पाचवी आणि आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा देता येते. वाशिम तालुक्यात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेकरीता ११७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ परीक्षा केंद्रांत ११३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ३९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता १००४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सात परीक्षा केंद्रांत ९५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ५३ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. वाशिम पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांच्यासह चमूने परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.

Web Title: More than two thousand students appeared for the scholarship exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम