पुरेशा सुरक्षेमुळे ‘आयसीयू’तील बाळांच्या माता निश्चिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:34 AM2021-01-14T04:34:12+5:302021-01-14T04:34:12+5:30
....................... कोट : माझे बाळ गेल्या १२ दिवसापासून आयसीयूमध्ये भरती आहे. येथील डॉक्टर, कर्मचारी व सर्व स्टाफ बाळाची चांगली ...
.......................
कोट :
माझे बाळ गेल्या १२ दिवसापासून आयसीयूमध्ये भरती आहे. येथील डॉक्टर, कर्मचारी व सर्व स्टाफ बाळाची चांगली काळजी घेत आहे. आमचीही राहण्याची व्यवस्था चांगली करण्यात आली असून परिसर स्वच्छ असल्यामुळे प्रकृती चांगली राहत आहे.
सुषमा गणेश वाघमारे (अमानी, ता. मालेगाव)
..................
माझे बाळ ११ दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. या ठिकाणी सर्व प्रकारची सुरक्षा ठेवण्यात आल्याने कुठलीही काळजी वाटत नाही. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियमित व्हिजिट होत असून विचारपूस केली जात आहे.
शीतल आतिष इंगोले (पोघात, ता. मंगरूळपीर)
.....................
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी आयसीयूतील बाळाची वेळोवेळी काळजी घेत आहेत. बाळाला भेटायला दिवस असो वा रात्र; कधीही नकार दिला जात नाही. आरोग्य विभागाने आमची राहण्याची व्यवस्थाही एका रूममध्ये केलेली आहे.
- स्वाती आदिनाथ आवारे (रिसोड)
....................
डॉक्टर कोट
भंडारा येथील घटनेमुळे सर्वत्र धास्ती पसरली आहे; मात्र वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व प्रकारे सुरक्षेची खबरदारी घेतली जात आहे. आयसीयूमधील सर्व नवजात मुले सुरक्षित राहावीत, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम